Sonam Kapoor Team Lokshahi
मनोरंजन

Sonam Kapoor : सोनमच्या व्हायरल फोटोचं सत्य झालं उघड

हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये सोनम हॉस्पिटलच्या बेडवर नवजात बाळाला पकडून ठेवताना दिसत आहे.

Published by : prashantpawar1

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर(Sonam Kapoor) लवकरच आई होणार आहे. आपल्या मुलाच्या जन्माची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते आतुर होत आहेत. सोनमच्या गरोदरपणाचा हा शेवटचा महिना आहे. आता लवकरच बाळाच्या आगमनाची खूशखबर येणार आहे. मात्र याच दरम्यान एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये सोनम हॉस्पिटलच्या बेडवर नवजात बाळाला पकडून ठेवताना दिसत आहे.

मुलाच्या जन्माचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. त्यामुळे फोटोत जे दिसते ते वास्तव आहे. सोनम कपूर आई झाली आहे का? हा व्हायरल फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना हे समजू शकले नाही की हे सर्व वास्तव आहे की त्यांच्यासोबत कोणीतरी विनोद केला आहे. चला तर मग या फोटोचे सत्य काय आहे ते सांगूया.

खरं तर सोनम कपूरने अद्याप मुलाला जन्म दिलेला नाही. सोनमसोबत दिसणारा मुलाचा हा फोटो फेक आहे. अभिनेत्रीचा हा फोटो एडिट करण्यात आला आहे. यात दुसरा फोटो जोडला आहे. या चित्रात काही तथ्य नाही. सोनम कपूरने मार्च 2022 मध्ये तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सोशल मीडियावर लोकांनी तिचे अभिनंदन करण्यास सुरुवात देखील केली. सोनमही तिच्या बेबी बंपचे फोटो सतत शेअर करत असते. सोनमचे वडील अनिल कपूर देखील आजोबा होण्यासाठी खूप उत्सुक आहेत. ज्या संबंधित त्यांनी आधीच पोस्ट शेअर केली आहे. सोनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर सोनम कपूर हिचं आनंद आहुजासोबत लग्न झाल्यापासून ती बॉलिवूड इंडस्ट्रीत फार कमी प्रमाणात सक्रिय आहे. 2020 मध्ये आलेला तिचा शेवटचा चित्रपट 'AK Vs AK' हा फ्लॉप ठरला होता. तिच्या पुढील चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर 'ब्लाइंड' हा सोनमचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटात तिच्यासोबत पूरब कोहली आणि विनय पाठक दिसणार आहेत. प्रसूतीनंतर सोनम कपूर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती