मनोरंजन

केतकी माटेगावकर ‘या’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका

Published by : Siddhi Naringrekar

गायिका-अभिनेत्री केतकी माटेगावकरची प्रमुख भूमिका असलेला, ओमकार फिल्म्स क्रिएशन्स निर्मिती संस्थेच्या राजाभाऊ आप्पाराव घुले यांची पहिलीच निर्मिती असलेला "अंकुश" हा बिगबजेट चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर आणि अभिनेत्री केतकी माटेगावकरचा चित्रपटातील लुक सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला.

ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून राजाभाऊ घुले "अंकुश" या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये धडाकेबाज पदार्पण करत आहेत. चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांची असून पटकथा व संवाद निशांत नाथाराम धापसे आणि नामदेव मुरकुटे यांचे आहेत, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांचे लेखक सह दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर निशांत नाथाराम धापसे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत. मराठीतील दिग्गज संगीतकार अमितराज आणि चिनार- महेश या सिनेमाचे संगीत करत आहेत, हिंदी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अमर मोहिले यांनी या चित्रपटाचे पार्श्वसंगीत केले आहे. मंगेश कांगणे आणि मंदार चोळकर यांनी गीतलेखन केलं आहे. नागराज दिवाकर यांनी छायांकन, तसेच अनेक पुरस्कार प्राप्त संकलक नीलेश गावंड यांनी या चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि केजीएफसारख्या चित्रपटांचे अॅक्शन दिग्दर्शक विक्रम मोर, विख्यात नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी नृत्य दिग्दर्शन असून चित्रपटातील गाणी परदेशात चित्रित करण्यात आली आहेत. कलादिग्दर्शन गिरीश कोळपकर यांनी केलं असून विशाल चव्हाण कार्यकारी निर्माता आहेत.

टीजरमध्ये थरारक बॅकग्राऊंड म्युझिकवर साखळ्या आणि पिस्तुल दिसते. त्यानंतर एक गोळी झाडली जाते. त्याशिवाय पोस्टरवरील केतकी माटेगावकरचे करारी आविर्भावही दिसत असल्यानं या चित्रपटात अॅक्शनपॅक्ड थ्रीलर कथानक पहायला मिळणार याची खात्री पटते. त्यामुळे या चित्रपटाविषयी आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

Shraddha Arya: लोकप्रिय सिरियल "कुंडली भाग्य"मधील अभिनेत्रीच्या घरात नव्या पाहुण्याची चाहूल

Navratri 2024: नवरात्रीचे नऊ दिवस अखंड ज्योति पेटती राहण्यासाठी घ्या "ही" काळजी

Navi Mumbai: खारघर-बेलापूर कोस्टल रोडसाठी सिडकोकडून टेंडर; रहिवाशांचा तीव्र विरोध

Navratri 2024: माहूर गडावर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरु

Navratri 2024: जाणून घ्या नवरात्रीमध्ये लावण्यात येणाऱ्या अखंड ज्योतिमागे काय आहे कारण...