प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या (Ketaki Mategaonkar) चुलत भावाचं दोन आठवड्यापूर्वी निधन झालं. केतकीच्या चुलत भावानं पुण्यामध्ये इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तो २१ वर्षाचा होता.
त्याच्या निधनानंतर 15 दिवसानंतर अभिनेत्री केतकी माटेगावकरने सोशल मिडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले की,“माझी अक्षु, माझा छोटासा गोड अक्षु, तुझ्यासारखा अत्यंत सुस्वभावी, समंजस, प्रचंड हुशार, मेहनती आणि गोड भाऊ मला मिळाला. आता काय लिहू, लिहू की नको लिहू…२१ वर्षाच्या आठवणी शब्दात कशा लिहू? हाच विचार करतेय. गेल्या काही दिवसांपासून माझ्या दिवसाची सुरुवातच तुझ्याबरोबर घालवलेल्या प्रत्येक क्षणांपासून होते. मला हे क्षण माझ्यापासून कधीच लांब करायचे नाहीत. किती आणि केवढ्या आठवणी आहेत.”
ती म्हणाली, “अभ्यास झाला की सगळं बाजूला ठेवून रियाझामध्ये हरवून जाणारा अक्षु. गजल, ठुमरी तर कधी हरिहरन, पिंक फ्लॉइड ऐकणारा अक्षु. भारतीय शास्त्रीय संगीत तर कधी फुटबॉलमधलं ज्ञान आत्मसात करणारा अक्षु. असा अक्षु मला सोडून गेला.” असे केतकीने म्हटले आहे.केतकीने सोशल मीडियाच्या माध्यमातून भावाला श्रद्धांजली वाहिली आहे.