चित्रपट विश्वातील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तो 40 वर्षांचा होता. मुंबईतील कपूर रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थ शुक्ला टीव्ही शो 'बालिका वधू'मधील 'शिव' भूमिकेमुळे प्रसिद्ध झाला. कूपर हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याने त्याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. सिद्धार्थ शुक्लाला सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे.
सिद्धार्थला मॉडेलिंगमध्ये काहीही रस नव्हता. तो या क्षेत्रात आला तो केवळ आणि केवळ आईच्या हट्टामुळे. सिद्धार्थला एक मोठा बिझनेसमॅन व्हायचे होते. पण लेकाचा चेहरा अगदी हिरोसारखा आहे, त्यामुळे त्याने मॉडेलिंग करावी, अभिनय करावा, अशी आईची इच्छा होती. आईच्या इच्छेखातर सिद्धार्थने मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला होता आणि आश्चर्य म्हणजे त्याने ही स्पर्धा जिंकली. इथूनच सिद्धार्थच्या मॉडेलिंग करिअरचा प्रवास सुरू झाली.
मॉडेलिंग, जाहिराती करत असतानाच बालिका वधू या मालिकेने सिद्धार्थ घराघरात लोकप्रिय झाला. यानंतर बॉलिवूडमध्येही त्याचा डेब्यू झाला. बिग बॉस 13 शिवाय खतरों के खिलाडी 7 चा तो विजेता होता.
आपल्या करिअरमध्ये सिद्धार्थने फार कमी वेळात मोठी उंची गाठली होती. कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीचा तो मालक होता. 2020 पर्यंत सिद्धार्थची एकूण संपत्ती 1.5 मिलिअल डॉलर म्हणजेच जवळपास 10 कोटी 94 लाख 55 हजार 750 रुपये इतकी होती. सिद्धार्थ शुक्लाची बहुतेक कमाई ही टीव्ही-शो आणि मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमधून होत होती.
सिद्धार्थचे मुंबईत घर आहे. इथे तो आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याने हे घर नुकतेच विकत घेतले होते. बाईक आणि कारचे प्रचंड वेड असलेल्या सिद्धार्थ बीएमडब्ल्यू 5 या अलिशान गाडीतून फिरायचा.