मनोरंजन

सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

Published by : Lokshahi News

'बिग बॉस 13' फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) पार्थिवावर आज (शुक्रवार) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल (गुरुवारी) हृदयविकाराच्या धक्क्याने सिद्धार्थचे निधन झाले होते. सिद्धार्थला मुंबईतील कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते, जिथे डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. सिद्धार्थच्या शवविच्छेदनाचा अहवाल डॉक्टरांनी पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दुपारी पार्थिवावर अंत्यसंस्कार
सिद्धार्थ शुक्लाचे पार्थिव कूपर हॉस्पिटलमधून ब्रह्मा कुमारी जुहू कार्यालयात नेण्यात येईल, तिथे पूजा केल्यानंतर त्याचे पार्थिव ओशिवारा भागातील घरी आणले जाईल. सिद्धार्थ शुक्लाच्या घराबाहेर पोलीस तसेच खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. सिद्धार्थच्या चाहत्यांनी त्यांच्या घराबाहेर पोस्टर लावून श्रद्धांजली वाहिली आहे. शोकाकुल चाहत्यांनी साश्रू नयनांनी त्याच्या घराबाहेर गर्दी केली होती. आज दुपारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

झोपण्यापूर्वी औषधांचे सेवन
दरम्यान, सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी काही औषधं सेवन केली होती, त्यानंतर तो सकाळी उठलाचा नाही. डॉक्टरांनी अहवालात हार्ट अटॅकमुळे त्याच्या मृत्यूची पुष्टी केली असताना, आणखी एक गोष्ट समोर आली आहे. या माहितीनुसार, काल रात्री सिद्धार्थ शुक्ला ज्या गाडीने फ्लॅटवर पोहोचला, त्या बीएमडब्ल्यू कारची मागील काच फुटलेली होती.

गाडीची ती अवस्था बघून उपस्थित होतायत शंका!
गाडीची ती अवस्था बघून, अशी अटकळ बांधली जात आहे की, सिद्धार्थचे काल रात्री कोणाशी भांडण तर झाले नाही ना? शेवटी, असे काय घडले ज्यामुळे कारची मागील काच तुटली? त्याने कोणाशी भांडण केले होते का, ज्यामुळे त्याला त्रास झाला होता?

रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत
तर पोलीस सूत्रांनुसार, सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबियांनी कोणतीही शंका व्यक्त केली नाही. डॉ. निरंजन यांनी सिद्धार्थचा तपास केला आणि येथे येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. सध्या सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे, याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. पोलिसांनी देखील आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news