चॉकलेट बॉय अर्थात गोड गुलाबजाम सिद्धार्थ चांदेकर आणि बोल्ड अँड ब्युटीफुल मिताली मयेकर या जोडीने अलीकडेच लग्न केले. आता त्यांच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. 'स्टोरीटेल मराठी' या ऑडिओबुकने नव्या सिरीजमध्ये ही जोडी 'हौस हजबंड' असे नाव असलेली ही सिरीज सादर करणार आहे.रोहित आणि रेवा या नवदाम्पत्याची कथा यामध्ये असणार आहे. या दोघांच्या आयुष्याबद्दलच्या कल्पना खूपच वेगळ्या आहेत. नवरा बायकोच्या रोलबद्दलच्या कन्सेप्ट जरा उलट्यापालट्या आहेत.
त्यात आजूबाजूचे सगळेच जण त्यांना येता जाता सारख्या सूचना करत असतात. सगळे मिळून या दोघा बिचाऱ्यांना सॉलिड सासुरवास उर्फ मेंटल टॉर्चर करतायत तर अशा वेळी त्यांची दोघांची टीम सॉलिड राहते का? ही गंम्मत या सिरजमधून ऐकायला मिळणार आहे.