मराठी अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. श्रेयसला मुंबईतील अंधेरीच्या बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचं रुग्णालयाकडून माहिती देण्यात आली आहे.
श्रेयस तळपदे 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाचे शूटिंग करत होता. शूटिंग संपवून घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर मुंबईतल्या अंधेरीमध्ये असलेल्या बेलव्हू रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळत आहे.
श्रेयसचे वेलकम टू जंगल या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलिन, लारा दत्ता, संजय दत्त, परेश रावल, अर्शद वारसी, तुषार कपूर, जॉनी लिवर हे कलाकार आहेत.