Shraddha Kapoor Birthday Update 
मनोरंजन

डेब्यू फिल्म नाही,'या' चित्रपटामुळं गाजली श्रद्धा कपूर, बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ

श्रद्धा कपूर तिचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करून सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Published by : Team Lokshahi

चित्रपटांमध्ये अष्टपैलू अभिनय करून कोट्यावधी चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेली सुंदर अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. दिग्गज अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या श्रद्धा कपूरचा आज ३७ वा जन्मदिवस आहे. चित्रपटांमध्ये अप्रतिम अभिनय करून चाहत्यांची वाहवा मिळवणारी श्रद्धा कपूर आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. श्रद्धा भारतातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. श्रद्धा कपूर तिचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करून सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. 'स्त्री २' स्टारर श्रद्धा कपूर सिनेविश्वात नेहमीच प्रकाशझोतात येते. विशेष म्हणजे तिनं डेब्यू फिल्ममध्ये नाही, तर तिने दुसऱ्या फिल्मच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवली आहे. श्रद्धाने 'एक व्हिलन', 'आशिकी २' आणि 'छिछोरे' चित्रपटात उल्लेखनीय कामगिरी केली आणि कोट्यावधी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली.

'या' चित्रपटामुळं उजळलं श्रद्धा कपूरचं नशिब

बॉलिवूडची मल्टी टॅलेंटेड आणि सुंदर अभिनेत्री श्रद्धा कपूरची सिनेविश्वात नेहमीच चर्चा असते. श्रद्धा कपूरने २०१० मध्ये 'तीन पत्ती' सिनेमातून फिल्मी करिअरला सुरुवात केली. दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला नाही. मात्र, एका चित्रपटाने श्रद्धा कपूरला रातोरात स्टार बनवलं. 'आशिकी २' असं त्या चित्रपटाचं नाव असून आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

...म्हणून आदित्य रॉय कपूर- श्रद्धा कपूरची रंगली तुफान चर्चा

मोहित सुरी यांच्या 'आशिकी २' चित्रपटामुळे श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांचं नशिबच पालटलं. १९९० मध्ये प्रदर्शित झालेला महेश भट्ट यांचा चित्रपट 'आशिकी' प्रदर्शित झाल्यानंतर २३ वर्षानंतर पुन्हा एकदा या चित्रपटाने कोट्यावधी रुपयांचा गल्ला जमवला. 'आशिकी २' या चित्रपटाचे गाणेही गाजले. तसंच 'आशिकी ३' चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. 'स्त्री २' या चित्रपटाच्या माध्यमातून २०२४ मध्ये श्रद्धा पुन्हा एकदा सिनेविश्वात झळकणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : मतमोजणीला सुरुवात; कोण उधळणार विजयाचा गुलाल?

Kolhapur District Assembly Constituency : पहिल्या कलामध्ये जिल्ह्यात महायुतीची आघाडी!

Election Commission | निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर गोंधळ, काँग्रेस आणि ठाकरे गटाचा कॉलमचं नाही

Ajit Pawar | Baramati | बारामतीत अजित पवार आघाडीवर, युगेंद्र पवार पिछाडीवर | Lokshahi News

आतापर्यंतच्या पोस्टल मतमोजणीत 'हे' नेते आघाडीवर