छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग ‘शिवप्रताप गरुडझेप’या चित्रपटामधून प्रेक्षकांना बघता येणार आहे. नुकताच 'शिवप्रताप गरुडझेप' या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या टिझर रिलीज झाल्यापासून प्रचंड व्हायरल होत आहे.
या संपूर्ण चित्रपटाची शुटींग आग्र्याच्या लाल किल्ल्यात झाली आहे. प्रत्यक्ष मराठी सिनेमाचं पहिल्यांदाच शूटिंग या किल्ल्यात होत होतं. या सिनेमांची घोषणा दोन वर्षांपूर्वी झाली होती. पण करोनामुळे शूटिंग सुरू होऊ शकलं नव्हतं.आज चित्रपटाची शूटिंग झाल्यानंतर लाल किल्ल्यातल्या शूटिंगचा अनुभव डाॅ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
डाॅ. कोल्हे लिहितात, 'अशा वातावरणात शूटिंग करणे म्हणजे वेडेपणा आहे, आग्र्याच्या लाल किल्ल्यात शूटिंग? कसं शक्य आहे? अनेकांच्या अनेक शंका.... पण प्रत्यक्ष इतिहास जणू ३५६ वर्षांनंतर त्या घटनेला कॅमेऱ्याच्या लेन्समधून पाहणार होता. ASI नियमावलीचे पालन करता करता होणारी दमछाक, त्यात ३८-४० डिग्री असलं तरी ७०% आर्द्रतेमुळे ४२-४४ वाटणारं तापमान. तेही सकाळी ९ वाजता. चुकून टाचणी विसरली तरी किल्ल्यातून बेस कँपपर्यंत पायपीट, ना बसायला खुर्ची ना पंखा.. सावलीसाठी आडोशाला उभं राहावं तर घामाच्या धारा आणि जरा हवेशीर ठिकाणी उभं राहावं तर उन्हाच्या झळा.' अश्या भावना त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या.