Admin
मनोरंजन

शरद पोंक्षेंनी थेट सावरकरांच्या कोठडीतून शेअर केला व्हिडीओ; म्हणाले “अरे ए मूर्खा…

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान विनायक सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान विनायक सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी थेट अंदमानमधून व्हिडीओ शेअर करत अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना टोला लगावला आहे.

अभिनेते शरद पोंक्षे यांनी थेट सावरकरांच्या कोठडीत जाऊन एक व्हिडिओ शेअर केला आहे. “अरे ए मुर्खा इकडे ये. कुठे भटकत असतोस? मुर्खासारखं जे काही तू फिरत आहेस, तसं फिरू नकोस. हिंमत असेल तर थेट इकडे ये. सेल्युलर जेलची कोठडी आहे ही. ही बघ सात बाय अकराची कोठडी आहे. याच्या खालची जमीन बघ. या जमिनीवरच झोपायचं. एवढीशी चड्डी, कैद्याचे कपडे, गळ्यात-हातात बेड्या, साखळदंड. कोपऱ्यातच संडास, लघवी करायची. तिथेच राहायचं,” असा हल्लाबोल पोंक्षे यांनी केला आहे.

यासोबतच शरद पोंक्षे म्हणाले की, “इथे ११ वर्ष तात्याराव राहिले. ब्रिटीशांनी त्यांना सोडलं नाही. त्यांच्या गळ्यामध्ये बिल्ला होता. त्यावर ‘डी’ असं लिहिलं होतं. डी म्हणजे अती धोकादायक (Dangerous). कोणत्याही कैद्याच्या बिल्ल्यावर ‘डी’ लिहिलं नव्हतं. फक्त त्यांच्याच बिल्ल्यावर ते दिसत होतं. माझं काहीच म्हणणं नाही, पण इथे ये. ११ वर्ष, ११ दिवस सोड पण एक दिवस तुझ्या गळ्यात सगळं अडकवतो. कच्च्या मांसाचे तुकडे, खराब अन्न, महारोग्यांच्या हाताने बनवलेलं अन्न, त्यातले किडे तुला खायला लावतो. हे सगळं कर माझ्या बाळा आणि मगच बोलून दाखव,” अशा शब्दात पोंक्षे यांनी टीका केली आहे.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...