शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे. शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्रानेच नाही तर जगाने प्रेम केलं. त्यांचं महाराष्ट्र गीत असो, खंडोबाचा जागर किंवा कोळी गीत.. प्रत्येकच गाणं हे माणसाच्या काळजात हात घालणारं. शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राला दिलेली 'महाराष्ट्राची लोकधारा' आजही अनेकांच्या स्मरणात आहे. शाहीर साबळे यांच्या पश्चात हा वारसा त्यांचा नातू म्हणजेच दिग्दर्शक केदार शिंदे पुढे नेत असून त्यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस आला.
शाहीर साबळे यांच्या भूमिकेत अंकुश चौधरी दिसत आहे. या टीझरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, साने गुरुजी, लता मंगेशकर यांची झलकही पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सना शिंदेनं शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली आहे.
हा चित्रपट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर शरद पवार आणि प्रतिभाताई यांनी या चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले. त्यानंतर त्यांनी ट्विट करुन सांगितले की,'शेवटचं गाणं सुरु झालं आणि मी अंकुशला पूर्णतः विसरून गेलो. मला फक्त शाहीर साबळे दिसले..धन्यवाद साहेब. असे शरद पवार यांनी ट्विट केलं आहे.