अभिनेता शाहरुख खान (shaharukh khan) आणि हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली (Anjalina Joli) यांनी एकदा 2000 साली इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स (IIFA) या कार्यक्रमामध्ये स्टेजवर परफॉर्मन्स (Performance) केला होता. त्यावेळच्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. एका जुन्या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांचा हात धरून स्टेजवर आले होते. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यासाठी या दोघांना तिथं बोलावण्यात आलं होतं. स्टेजवर असे काही घडले की अँजेलिना अगदी जोरात हसली होती.
शाहरुख स्टेजवर येताच म्हणाला की सर्वांना माझ्याकडून शुभ संध्याकाळ. ही संध्याकाळ खूपच सुंदर आहे. कारण मी अँजेलिनाच्या सोबत आहे. ती तुमच्याशी काहीतरी बोलू इच्छित आहे. अँजेलिना पुढे म्हणाली 'नमस्ते इंडियावाले' असं म्हणताच शाहरुखने लगेच हसून टाळ्या वाजवल्या आणि त्यानंतर प्रेक्षकांनीही जल्लोष केला. तो पुढे म्हणाला की मला येथे आमंत्रित केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्हा सर्वांना भेटून खूप छान वाटलं.
त्या पुरस्कार सोहळ्यात शाहरुख आणि अँजेलिना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यास आले होते. त्याक्षणी ऐश्वर्या राय (Aishawarya Ray) हिला 'हम दिल दे चुके सनम' 1999 या वर्षातली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ऐश्वर्याला हा पुरस्कार प्रदान करण्यास त्याला बोलावलं होतं. या कार्यक्रमाला ऐश्वर्या उपस्थित नसल्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी तिच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर आले होते.
संजयने ट्रॉफी हातात घेताच शाहरुख गमतीने म्हणाला आम्हाला याची खात्री करावी लागेल की हा अवॉर्ड नक्की कोणासाठी जेणेकरून अँजेलिनाला कळेल. अँजेलिना जोरात हसली. शाहरुख पुन्हा म्हणाला की तुम्ही चित्रपट दिग्दर्शक आहात. मग तो भाऊ किंवा बहीण असो त्याच्याकडून पुरस्कार प्राप्त करण्यासाठी हे पुरेसे आहे. हा पुरस्कार सोहळा 24 जून 2000 रोजी लंडनमधील मिलेनियम डोम येथे पार पडला.