'बागबान'चे पटकथा लेखक शफीक अन्सारी ( यांचे आज निधन झाले. आज (३ नोव्हेंबर) सकाळी मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयाच्या 84 व्या वर्षी अन्सारी यांनी अखेरचा श्वास घेतला. ते मुंबईतील अंधेरी या भागात राहत होते.
शफीक अन्सारी यांचे चिरंजीव मोहसिन अन्सारी यांनी वडिलांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावरुन दिली आहे. शफीक यांच्या पार्थिवावर मुंबईतील ओशिवारातील दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत
शफीक अन्सारी यांचे चिरंजीव मोहसिन अन्सारी यांनी वडिलांच्या निधनाची बातमी दिली आहे.
शफीक यांनी 1974 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 'दोस्त' चित्रपटाची पटकथा त्यांनीच लिहिली होती. अभिनेता धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी 'दोस्त' चित्रपटात एकत्र काम केले. यानंतर त्यांनी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या 1990 मध्ये आलेल्या 'दिल का हिरा' आणि त्यानंतर 'इज्जतदार' या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली होती.2003 मध्ये आलेल्या अमिताभ आणि हेमा मालिनी यांच्या प्रसिद्ध 'बागबान' या चित्रपटाचे लेखन शफीक यांनी केले होते.