सध्या बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून आपला जम बसवणारी अभिनेत्री सारा अली खान(Sara ali khan) ही नेहमी कुठल्या ना कुठल्या बाबतीत चर्चित असते. साराने २०१८ साली 'केदारनाथ' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूरन(Abhishek Kapoor) यांनी केले आहे. या चित्रपटात सारासोबत सुशांत सिंग राजपूत(Sushant Singh Rajput) मुख्य भूमिकेत दिसला होता. मात्र आज तुम्हाला सांगणार आहोत की जेव्हा सारा अली खानने तिच्या पालकांना चित्रपटात पदार्पण करण्याबाबत सांगितले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया कशी होती याबद्दल.
सैफ अली खानचे अमृता सिंहसोबत लग्न झाल्यानंतर साराचा जन्म झाला. सारा अभ्यासात प्रचंड हुशार होती असे तिच्या पालकांचे म्हणणे आहे. वाचन करण्यात तिला अधिक आवड होती मात्र तिला आपलं करिअर अभिनयात करायचं हे तिने मनामध्ये ठाम केलं होतं. ज्या मुलीला वाचनात आणि लिखाणात अधिक रस आहे, अशा मुलीने आपलं करिअर अभिनयात करायचं हे ऐकल्यानंतर साराच्या कुटुंबियांना प्रश्नच पडला होता. ती म्हणते जेव्हा माझा निर्णय माझ्या वडिलांना म्हणजेच (Saif Ali Khan) यांना कळला तेव्हा त्यांनीही साराला अधिक प्रश्न विचारले होते. सारा म्हणते 'तिच्यासाठी हे खूपच आश्चर्यकारक होतं कारण ज्या मुलीला वाचना-लिहिण्यात जास्त रस आहे ती अचानक म्हणाली की मला अभिनेत्री व्हायचं यामुळे साहजिकच आपल्या पालकांना प्रश्न पडतोच. माझ्या आई-वडिलांना माझे काम जरी खूप आवडत असले तरी त्यांच्या पाठिंब्यामुळे मी या क्षेत्रात चांगले काम करू शकते असं त्यांना नेहमीच वाटत असतं.