Aamir Khan Team Lokshahi
मनोरंजन

Aamir Khan : संजय गुप्ताचा आमिरला सवाल; चाहत्यांमध्ये चर्चेचा बवाल...

मग काय या पोस्टनंतर चाहत्यांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली...

Published by : prashantpawar1

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) यांच्या चित्रपटाची प्रेक्षकांना बऱ्याच अवधी वाट पाहावी लागते. अगदी त्याचप्रमाणे प्रेक्षक आमिर खानच्या मोस्ट अवेटेड 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल नेहमीच काही ना काही किस्से चर्चित असतात. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा चित्रपट निर्माते संजय गुप्ता (Sanjay Gupta) यांनी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाबद्दल दिलेल्या प्रतिक्रियेची मीडियात चर्चा होत आहे. संजय गुप्ता यांनी अशी काही पोस्ट केली जी चाहते सोशल मीडियावर शेअर करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. 'मुंबई सागा' ते 'शूटआउट अ‍ॅट लोखंडवाला' असे चित्रपट बनवणारे चित्रपट निर्माते संजय गुप्ता यांनी हा चित्रपट का पाहायचा आहे यामागचं कारण सांगितलेलं आहे.

मागील मंगळवारी चित्रपट निर्माते संजय गुप्ता यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक ट्विट केले होते. ट्विटमध्ये आमिर खान यांचा गोलगप्पा खातानाचा फोटोही पोस्ट केला आहे. त्याचबरोबर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे की 'हेच कारण आहे की, मी हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे. चालत्या ट्रेनमध्ये तुम्हाला गोल गप्पा कुठे खायला मिळाला?'

मग काय या पोस्टनंतर चाहत्यांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. कोणीतरी चित्रपटाबद्दल खिल्ली उडवली तर कोणी ट्रेनमध्ये काय मिळतं याबद्दल सांगू लागले. आयपीएल फायनलच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आमिर खानने देखील सांगितले की चित्रपट पाहिल्यानंतर टॉम हँक्सचे काय होईल हे पाहण्यासाठी मला खूप उत्सुकता आहे. हा चित्रपट टॉम हँक्सच्या हॉलिवूड (Hollywood) चित्रपट 'फॉरेस्ट गंप रिमेक'चा रिमेक आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news