Sanjay Dutt 
मनोरंजन

टॉलिवूड मुव्हीमुळे बॉलीवूडला उतरती कळा, असे संजय दत्त का म्हणाले ?

Published by : Saurabh Gondhali

सध्या दाक्षिणात्य सिनेमा हा बॉलिवूडला मागे टाकत आहे. अगदी कोरोना काळात सुद्धा अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. त्याला रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. गेल्यावर्षी अल्लू अर्जुनचा पुष्प हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानेसुद्धा हिंदी पट्ट्यांमध्ये भरघोस बॉक्स ऑफिसवर कमाई केली. आता काही दिवसांपूर्वीच एस एस राजमौली S S RAJAMAULI यांचा RRR हा सिनेमा येऊन गेला. या सिनेमाने सर्व रेकॉर्ड तोडून टाकले. आता ही चर्चा पुन्हा करायचे कारण म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला केजीएफ 2 KGF 2 हा सिनेमा होय. या सिनेमाची अगदी मराठी, हिंदी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळेच बॉलीवूड चित्रपटाची पीछेहाट होते आहे असे सध्याचे चित्र आहे,असे संजय दत्त SANJAY DUTTयांनी भाष्य केले आहे.

बॉलीवूडला जर पुन्हा जोरदार कमबॅक करायचे असल्यास तर त्यांना पुन्हा पूर्वीचा हिरोइझम प्रेक्षकांपुढे मांडावा लागेल. आता बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि केजीएफमध्ये प्रमुख भूमिका साकारलेल्या संजय दत्तनं टॉलीवूडच्या वाढत चाललेल्या प्रभावाविषयी आणि बॉलीवूडच्या घसरणाऱ्या दर्जावर भाष्य केले आहे. संजय दत्तनं केजीएफ 2 मध्ये गरुडाचा भाऊ अधीराची भूमिका साकारली असून (Sanjay Dutt as Adeera as KGF Chapter 2) त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. संजय दत्तनं एका मुलाखतीमध्ये सांगितले की, मला वाटतं बॉलीवूड आता आपल्या हिरोइझमपासून दूर चाललं आहे. त्यानं आता दमदारपणे पुनरागमन करण्याची गरज आहे. दुसरीकडे साऊथ इंडस्ट्रीनं आपली ओळख काही विसरलेली नाही. त्यांच्याकडे हिरोइझमशी संबंधित चित्रपट तयार होण्याचे प्रमाण मोठे आहे. आपल्याककडे तसे नाही. वेगवेगळ्या विषयांवर जरी आपण चित्रपट तयार केले असले तरी ते प्रभावीपणे पोहचवण्यात निर्माते आणि दिग्दर्शक कमी पडत आहेत.

आपले दिग्दर्शक हे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान मधील प्रेक्षकांना विसरले आहे. असे वाटते. जो सगळ्यात मोठा आपला प्रेक्षकवर्ग आहे. त्यालाच विसरल्यानं त्याचा मोठा फटका बॉलीवूडला बसला आहे. मला असे वाटते अशी परिस्थिती ही काही कायम राहणारी नाही. मात्र त्यातून तातडीनं पर्याय शोधणे गरजेचे आहे. असेही संजय दत्तनं यावेळी सांगितले.

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर