मनोरंजन

'सलमान खानने माफी मागावी तो बदमाश माणूस आहे' राकेश टिकैत

सलमान खानने काळवीट शिकार प्रकरणावर बिश्नोई समाजाची माफी मागावी, शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा सल्ला. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील वाद पुन्हा चर्चेत.

Published by : shweta walge

महाराष्ट्राचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानचे काळवीट शिकार प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. बाबा सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. तेव्हापासून सलमान खान आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्याबाबत सातत्याने चर्चेत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी सलमान खानला बिश्नोई समाजाची माफी मागायला सांगितली आहे. त्याचवेळी सलमान खानचे वडील सलीम खान यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्यांच्या मुलाने हरणाची हत्या केली नाही. दरम्यान, आणखी एका नेत्याने सलमान खानला बिश्नोई समाजाची माफी मागायला सांगितली आहे.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये, जर हे समाजाशी संबंधित असेल तर सलमान खान माफी मागावी. समाजाच्या कोणत्याही मंदिरात जाऊन त्यांनी चूक केली असे सांगितले तर समाजातही त्यांचा सन्मान होईल. त्याने माफी मागितली पाहिजे, अन्यथा तो तुरुंगात आहे, तो बदमाश माणूस केव्हा आणि कुठे मारुन टाकेल कोणास ठाऊक.

दरम्यान, लॉरेन्स बिष्णोई गँग आणि सलमान खान यांच्यामधील वादाला कारणीभूत हे काळ्या हरणाची म्हणजे काळविटाची शिकार आहे. राजस्थानमध्ये 'हम साथ साथ है' या चित्रपटाचे शूटिंग सुरू होतं आणि त्या दरम्यान सलमान खानने दोन काळविटांची शिकार केली. वन्य प्राण्यांच्या शिकारीवर प्रतिबंध असताना सलमानने हे कृत्य केल्याने तो कायद्याच्या कचाट्यात सापडला. या प्रकरणी ५ एप्रिल २०१८ रोजी सलमान खानला हरणाची शिकार केल्याप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. दोन दिवसांनी त्याला जोधपूर मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आलं. दोन दिवसांनंतर त्याला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आणि तो तुरुंगातून बाहेर आला. यामुळे लॉरेन्स बिष्णोई गँग मात्र सलामान खानवर प्रचंड नाराज झाली.

Gopal Shetty | गोपाळ शेट्टींकडून अपक्ष लढण्याची घोषणा, आशिष शेलार घेणार शेट्टींची भेट | Lokshahi

शिवसेनेची तिसरी यादी जाहीर

Shivsena Candidate 3rd List: शिवसेनेची तिसरी यादी जाहीर

Sharmila Thackeray Exclusive | अमित ठाकरे आमदार झालेले पाहायला आवडतील : शर्मिला ठाकरे | Lokshahi

'विधान परिषदेला वनगांना संधी देणार', मुख्यमंत्री शिंदेंचा वनगा कुटुंबीयांशी संवाद