मनोरंजन

Video : सिक्स पॅक अ‍ॅब्ससाठी व्हीएफएक्स? सलमानने भर कार्यक्रमात थेट...

सलमान खानच्या मोस्ट अवेटेड फिल्म ‘किसी का भाई किसी की जान’चा ट्रेलर मुंबईतील एका कार्यक्रमात चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आला.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सलमान खानच्या मोस्ट अवेटेड फिल्म ‘किसी का भाई किसी की जान’चा ट्रेलर मुंबईतील एका कार्यक्रमात चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आला. या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमादरम्यान सलमानच्या सिक्स पॅक अ‍ॅब्सबद्दलही बोलले गेले. मोठ्या पडद्यावर सिक्स पॅक अ‍ॅब्ससाठी सलमान व्हीएफएक्सचा वापर करत असतो, अशा चर्चा नेहमीच होत असतात. अखेर सलमानने याचे उत्तर स्वतःच दिले आहे.

'किसी का भाई किसी की जान'च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये, सलमानला त्याच्या सिक्स-पॅक अ‍ॅब्सबद्दल विचारले असता त्याने थेट स्टेजवरच शर्टाचे बटण काढत सिक्स पॅक दाखवले. यावेळी उपस्थित लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सलमान म्हणला की, तुम्हाला वाटते की ते व्हीएफएक्स आहेत. माझ्याकडे आधी चार अ‍ॅब्स होते पण आता सहा आहेत, असे त्यांनी सांगितले. 'किसी का भाई किसी की जान'च्या ट्रेलरमध्ये सलमान क्लायमॅक्समध्ये शर्टलेस दिसत आहे.

ट्विटरवर सलमान खानचे सिक्स पॅक अ‍ॅब्स दाखवत असलेला व्हिडिओ शेअर करताना एका चाहत्याने लिहिले, हा आत्मविश्वास आहे आणि तिरस्कार करणाऱ्यांना चुकीचे सिद्ध करत आहे. व्हीएफएक्स नाही फक्त बॉडी बिल्डिंग, असे म्हंटले आहे.

'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद शामजी यांनी केले आहे. अॅक्शन कॉमेडी चित्रपट 21 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 2014 मध्ये आलेल्या तमिळ चित्रपट 'वीरम'चा रिमेक आहे. या चित्रपटात पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्याही भूमिका आहेत.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय