बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानला पतौडीचा नवाब म्हणले जाते. सैफ आणि अभिनेत्री करिना कपूर यांच्या पतौडी पॅलेसची चर्चा नेहमी होत असते. या पॅलेसमध्ये काय काय आहे? या पॅलेसची किंमत काय? असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडतात. म्हणूनच जाणून घेऊयात सैफच्या पतौडी पॅलेसबद्दल काही खास गोष्टी.
नुसैफचा पतौडी पॅलेस हा हरियाणामध्ये आहे. पतौडी पॅलेसमध्ये 150 खोल्या आहेत. तसेच 100 नोकर या पॅलेसमध्ये काम करतात पतौडी पॅलेसमध्ये वीर-जारा, मेरे ब्रदर की दुल्हन आणि मंगल पांडे या सुपर हिट चित्रपटांचे चित्रीकरण या पॅलेसमध्ये झाले आहे. तांडव या वेब सीरिजचे देखील शूटिंग या पॅलेसमध्ये झाले आहे.
पतौडी पॅलेस हा डिझाइन रॉबर्ट टोर रसेल यांनी डिझाइन केला आहे. रॉबर्ट टोर रसेल यांनी दिल्लीमधील कनॉट प्लेस देखील डिझाइन केले होते.हा पॅलेस इब्राहिम कोठी म्हणून देखील ओळखला जातो. पतौडी पॅलेसची किंमत 800 कोटींपेक्षा जास्त आहे.