Kushal Badrike 
मनोरंजन

‘साब ये लडका बडा होके….’ कुशल बद्रिकेनं सांगितला लहानपणीचा किस्सा

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळं घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला (Kushal Badrike) हे नाव आता आपल्याला नवं नाही.

Published by : Pankaj Prabhakar Rane

मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळं घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला (Kushal Badrike) हे नाव आता आपल्याला नवं नाही. कुशलनं आपल्या नाविण्यपूर्ण अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम कुशलनं अतिशय कुशलपणे करत असतो. त्यामुळं मराठी प्रेक्षक कुशलवर अगदी भरभरून प्रेम करतात. कुशलचा मनोरंजन क्षेत्रातील हा प्रवास सोपा नव्हता. एका सामान्य कुटुंबातील कुशलने आपल्या मेहनतीच्या जोरावर हा मुक्काम गाठला. कुशलने याच बाबात एक भावूक पोस्ट शेअर केली.

कुशल हा जितका मनोरंजन क्षेत्रात लोकप्रिय आणि अॅक्टिव असतो, तितकाच तो सोशल मीडियावरही सक्रीय असतो. तो आपल्या चाहत्यांसोबत नेहमी काहीतरी, फोटो, व्हिडिओ आणि किस्से शेअर करतो. सध्या तो लंडनच्या दौऱ्यावर निघाला. आपल्या सोशल मीडियावर विमानतळावरील फोटो शेअर करत त्याने एक किस्सा सांगितलं. कुशल लिहितो-

मी लहान असतांना माझ्या वडिलांना पान खायची भारी हौस होती. 120/300 कत्री सुपारी पंढरपुरी तंखाबू मारके. आणि त्या पानाचे पैसे, मला माझ्या हातून द्यायची भारी हौस.

लहानपणी एकदा, असंच पप्पांच्या पानाचे पैसे मी देत असतांना त्या चौहान पानवाल्याने माझा हात पाहिला आणि म्हणाला…. “साब ये बडका बडा होके कुछ बनेगा, देखो ये ना…. देस बिदेस घुमेगा!”

लहानपणई कन्नी कापलेल्या पतंगामागे ‘उरफाटेस्तोवर’ धावणाऱ्या मला, माझ्या आई-वडिलांनी कधी स्वप्नांच्यामागे ‘उरफाटेस्तोवर’ धावायला लावलं नाही, आणि झाडाला ‘व्हलटा’ (छोटी काटी) मारून हवी असलेली कैरी पदरात पाडून घेणाऱ्या माझ्यातही हवी असलेली स्वप्न पदरता पाडून घेण्याचं स्किल कधी आलं नाही. जे जसं होतं गेलं, तसा मी घडत गेलो, घरातून प्रामाणिकपणाची शिदोरी तेवढी मिळाली होती ती मात्र, ह्या प्रवासात कामी आली आणि अजूनही येते. माझ्या आई-बाबांनी अवास्तव स्वप्न पाहून स्वत:च्या पापण्या कधी जड करून घेतल्या नाहीत, की अपेक्षांचं ओझं माझ्या खांद्यावर टाकून, माझ्या आयुष्याला कुबड आणलं नाही, म्हमून मी आता पानवाल्या चौहान साबचं बोलणं खरं करायला निघालोय.

आज पुन्हा मी लंडनच्या प्रवासाला निघालोय. नशीबाच्या पानावर माझ्यासाठी काय लिहून ठेवलय मला माहित नाही, पण त्यादिवशी चौहान साबने पप्पांच्या 120/300 पानावर माझा हा लंडन दौरा लिहिला असेल हे नक्की.दरम्यान, कुशलच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत. प्रांजळ मनोगत, अशी कमेंट एका व्यक्तीने कली आहे. तर एकानं सॉलिड लिहिलंय तेही अगदी मनातलं असं म्हटलंय. सध्या कुशलची ही पोस्ट चर्चेत आहे.

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती