मनोरंजन

RRR BOX OFFICE COLLECTION: RRR फिल्मचा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाईचा नवा रेकॉर्ड

Published by : Vikrant Shinde

एसएस राजामौली(S. S.Rajamauli ) यांची मोस्ट अवेटेड फिल्म आर आर आर (RRR ) फिल्म ही चित्रपटगृहात आली असून हिंदी पट्ट्यामध्ये या फिल्म ने जोरदार कमाई ला सुरुवात केली आहे. तेलुगूमध्ये तर या फिल्म ने धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवशी फ्री बुकिंग थोडी स्लो वाटत होती, परंतु असे न होता मल्टिप्लेक्स असो अथवा सिंगल स्क्रीन प्रत्येक ठिकाणी ही फिल्म हाऊसफुल जात आहे. ही फिल्म हिंदी मध्ये हॉलिडे ला ओपनिंग न होणारी सर्वात मोठी फिल्म आहे.

आर आर आर (RRR) हिंदी फिल्म मध्ये पहिल्या दिवशी २० कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे. परंतु अजून पूर्ण आकडा समोर यायचा आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार या मुवीने २५% अधिक कमाई केली आहे. याचे कारण ही फिल्म १४ ते १५ कोटी कमावेल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु या फिल्म पहिल्याच दिवशी २० कोटीची कमाई करत धमाकेदार सुरुवात केली आहे. या फिल्म ने पहिल्या दिवशी जगभरात एकूण २४० कोटींची कमाई केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या मूवी ने कमाई संदर्भातील सर्व रेकॉर्ड तोडून टाकले आहेत.

मुंबई ही आर आर आर  (RRR) साठी सर्वात छान फेयरिंग सर्किट होतं. यानंतर गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश यांचा क्रमांक येतो. आर आर ला घेऊन लोकांचा रिस्पॉन्स खूप पॉझिटिव आहे. त्यामुळे एक गोष्ट कळून चुकते की एसएस राजामौली यांच्या दिग्दर्शनाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांवर पडली आहे.

हे आकडे अधिक जास्त असते, जर ही फिल्म होळीच्या दिवशी रिलीज केली असती .परंतु शुक्रवारच्या दिवशी ही मूवी रिलीज करून शनिवार, रविवार असल्यामुळे ही फिल्म किती धमाके करते हे पाहणे महत्त्वाचे असेल.

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका