Ravindra Mahajani : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. राहत्या घरातच त्यांचा मृत्यू झाला. तळेगाव आंबी एमआयडीसी येथील सोसायटीमध्ये महाजनी राहायचे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ते येथील एका सदनिकेत भाडेतत्वावर राहत होते. याच घरामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. मात्र दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र मुलगा गश्मीर महाजन एवढा मोठा स्टार असताना देखिल रवींद्र महाजनी गेल्या काही महिन्यांपासून एकटे का राहत होते? असा सवाल आता नेटकऱ्यांकडून विचारला जात आहे. गश्मीर हा मराठीसोबत हिंदी चित्रपटात देखिल अभिनेता आहे.
रवींद्र महाजनी यांनी 1975 ते 1990 या काळात यांनी मराठी सिनेसृष्टी गाजवून सोडली. देखणा नट म्हणून रवींद्र महाजनी यांची ओळख होती. मुंबईचा फौजदार, लक्ष्मी, लक्ष्मीची पावलं, गोंधळात गोंधळ, देवता, झुंज, आराम हराम आहे. असे अनेक सिनेमे चांगलेच गाजले.