Ranbir Kapoor Team Lokshahi
मनोरंजन

Ranbir Kapoor : 'Animal'साठी रणबीरची झाली अशी निवड...

'हा' चित्रपट रिलीज होण्यास अजून बराच कालावधी आहे...

Published by : prashantpawar1

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. अलीकडे म्हणजेच एप्रिल महिन्यात तो अलिया भट्टसोबत (Alia bhat) लग्न बंधनात बांधला गेला. तेव्हापासून तो केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. रणबीर नेहमीच लोकांचा लाडका असला तरी देखील निर्मात्यांची त्याला चित्रपटांची मागणी आहे. मात्र प्रत्येक वेळी असेच होईल असे नाही. यातील एक चित्रपट म्हणजे 'Animal'. हा चित्रपट रिलीज होण्यास अजून बराच कालावधी आहे पण या चित्रपटाची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. मात्र या चित्रपटासाठी रणबीर निर्मात्यांची पहिली पसंती नव्हता.

'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या निर्मात्यांनी रणबीर कपूरच्या आधी या चित्रपटासाठी तेलुगू सुपरस्टारशी संपर्क साधला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार संदीप रेड्डी वंगा (Sandip Reddy Wanga) यांनी चित्रपटासाठी रणबीर कपूरच्या आधी महेश बाबूशी संपर्क साधला होता. रिपोर्ट्सनुसार संदीप रेड्डी वंगा नेहमीच महेश बाबूसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक असतात. त्याचबरोबर महेश बाबू यांनाही चित्रपटाची पटकथा आणि उद्दिष्टे आवडली होती. पण काही समस्यांमुळे काम न झाल्याने त्याने या चित्रपटासाठी नकार दिला. अशा परिस्थितीत हा चित्रपट रणबीर कपूरच्या झोळीत पडला. या चित्रपटात रणबीर कपूर आणि कबीर सिंगचे निर्माते संदीप रेड्डी वंगा पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या चित्रपटात रणबीर कपूर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. रणबीरच्या इतर चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच 'शमशेरा' आणि 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये त्याची व्यक्तिरेखा खूप आगळी वेगळी पहायला मिळणार आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती