बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) सध्या त्याच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटामुळे खुप चर्चित आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तो अडचणीत सापडला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल खूप ट्रोल केलं जातं आहे.
हा चित्रपट पाहू नका म्हणत या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची विनंती करण्यात आली आहे. यामुळे ट्विटरवर #BoycottBrahmastra हा ट्रेंड होत आहे.
रणबीर ट्रेलरमध्ये शूज घालून मंदिरात जाताना दिसत आहे.
खरं तर सोशल मीडियावर लोक रणबीरवर नाराज आहेत. कारण जेव्हा 'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा लोकांच्या लक्षात आलं होतं की रणबीर चित्रपटात बूट घालून मंदिरात जात आहे. चित्रपटात हिंदू धर्माचा अपमान करण्यात आला असं अनेकांनी सांगितलं आहे.
'पीके'मध्ये रणबीरच्या गालावर हिंदू देवतांचे स्टिकर होते.
याचबरोबर आमिर खानच्या 'पीके' या चित्रपटाचे फोटो ट्विटरवर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये रणबीरही दिसत आहे. या फोटोंमध्ये रणबीरच्या गालावर हिंदू देवी देवतांचे स्टिकर दिसत आहेत. त्यामुळे लोक त्याच्यावर नाराज होत आहेत. चित्रपटाच्या सीनमध्ये रणबीरने गालावर देवी देवतांचे स्टिकर लावून धर्माचा अपमान केल्याचं देखील ट्रोलर्सचं म्हणनं आहे.