रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाबाबत सध्या चर्चांना उधाण सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.
अधिकृतपणे रणबीर आणि आलिया या दोघांनीही लग्नाची (Ranbir-Alia Wedding) तारीख उघड केलेली नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात लग्नाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी, तिचा पती भरत साहनी आणि भाची समायरा यांचे मुंबईत आगमन झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाचे ठाम संकेत दिसत आहे. आलिया-रणबीरच्या लग्नाची तारीख जाहीर झालेली नसली तरी लग्नाची जोरदार तयारी दिसून येत आहे.
कपूर आणि भट्ट ()कुटुंबीयांनी या लग्नावर मौन बाळगले आहे. परंतु त्यांच्या घरी सुरु असलेली लगबग आणि तयारी पाहून चाहत्यांना विश्वास बसला असून रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या प्री वेडिंग फंक्शन्सला आजपासून सुरूवात होत आहे. तर प्री वेडिंग फंक्शन्स रणबीर कपूरच्या 'वास्तू' या निवासस्थानी होणार आहे.
13 एप्रिलपासून आलिया आणि रणबीर यांच्या लग्ना आधीच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. 13 एप्रिल रोजी सकाळी 11:00 वाजता 'वास्तू'मध्ये गणेश पूजन होणार असून या शुभ कार्याची सुरुवात श्रीगणेशाच्या पूजेने होणार आहे.
यानंतर दुपारी मेहंदीचा कार्यक्रमही होणार आहे. हे सर्व कार्यक्रम फक्त 'वास्तू'मध्येच होणार असल्याचं म्हटलं जात आहे. गणेश पूजन आणि मेहंदी फंक्शन्ससोबतच जवळच्या मित्रांसाठी कॉकटेल पार्टीचेही आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. कृष्णा राज बंगल्यात ही पार्टी होणार असल्याचं समोर येत आहे.