मनोरंजन

Jau Bai Gavat Winner : रमशा फारुकी ठरली 'जाऊ बाई गावात'च्या पहिल्या पर्वाची विजेती

Edited by : Team Lokshahi

'झी मराठी' वाहिनीवरील 'जाऊ बाई गावात' हा रिअॅलिटी शो ४ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. ३ महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर ११ फेब्रुवारी रोजी या शोच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. रमशा फारुकीने 'जाऊ बाई गावात'च्या पहिल्या पर्वाचं विजेतेपद पटकावलं आहे. तर, अंकिता मेस्त्री ही उपविजेती ठरली.

रमशाला २० लाखांचा धनादेश आणि ‘जाऊ बाई गावात’ची मानाची ट्रॉफी देण्यात आली. या सोहळ्यासाठी खास पाहुणे आदेश बांदेकर, सोनाली कुलकर्णी आणि महेश मांजरेकर उपस्थित होते. रमशा फारुकी, रसिक ढोबळे, संस्कृती साळुंके, अंकिता मेस्त्री आणि श्रेजा म्हात्रे या टॉप ५ स्पर्धकांमध्ये चुरचीशी स्पर्धा पाहायला मिळाली. पण यामधून रमशा, संस्कृती आणि अंकिता या टॉप-३मध्ये पोहोचल्या.

या टॉप-३मधून रमशाने बाजी मारत ‘जाऊ बाई गावात’च्या पहिल्या पर्वाच्या ट्रॉफीवर आपलं नावं कोरलं. 'जाऊ बाई गावात' मध्ये प्रत्यक्षात गावात राहुन वेगवेगळे टास्क पूर्ण करण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर होते. तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधणे, त्यांच्यासोबत ग्रामीण भागातील जीवन जगणे असे आव्हानात्मक टास्क या रिअॅलिटी शोमध्ये होते.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा