Salman Khan Team Lokshahi
मनोरंजन

Salman Khan : सलमान सोबतच राम चरण दिसणार 'या' चित्रपटात...

राम चरण यांची चित्रपटातली भूमिका फारच लहान असल्याचं देखील म्हटलं जातय...

Published by : prashantpawar1

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman khan) सध्या त्याच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सलमान खान यांच्याबरोबर या चित्रपटामध्ये मुख्य भुमिकेत अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) असणार आहे. या दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जातोय की राम चरण (Ram Charan) हा 'कभी ईद कभी दिवाली' मध्ये दिसणार आहे. तथापि या मेगा स्टारमधील राम चरण यांची चित्रपटातली भूमिका खूपच लहान असल्याचं म्हटलं जात आहे. हैदराबादमध्ये अभिनेत्री पूजा हेगडे सोबत 'कभी ईद कभी दिवाली'च्या लार्जर दॅन लाइफ या गाण्याचे शूटिंग करत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार या गाण्याचे शूटिंग पाहण्यासाठी RRR फिल्म स्टार राम चरण देखील सलमानला भेटण्यासाठी सेटवर पोहोचला होता. यानंतर सलमान खानने निर्मात्यांना सल्ला दिला आहे की या गाण्यातही राम चरण यांना ठेवलं जाईल जेणेकरून या गाण्यासाठी आणि चित्रपटासाठी देखील ते फायदेशीर ठरेल. यावर राम चरण यांनीही होकार दिला आहे. ज्याच्या अंतर्गत चाहत्यांना ईद कभी दिवाळीमध्ये साऊथ सिनेसृष्टीतील स्टार राम चरणची झलक पाहता येईल. राम चरण देखील सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाळी'चा एक भाग बनला तर या मेगा स्टार चित्रपटात आणखी एक अभिनेता सहभागी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण राम चरणच्या आधी शहनाज गिल (Shahnaj Geel), जस्सी गिल (Jassi Geel) आणि आयुष शर्मा (Ayush Sharma) यांसारखे मोठे कलाकार 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटात सामील झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. अशा स्थितीत सलमान खानसोबत 'कभी ईद कभी दिवाली' मध्ये राम चरण यांना पाहणे हे चाहत्यांसाठी अधिक मनोरंजनात्मक ठरणार आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय