साउथ सुपरस्टार राम चरण व उपासना पालक बनले आहेत. रामचरणला आज कन्यारत्न प्राप्त झाले आहे. अनेक दिवस चिरंजीवी कुटुंब या खास क्षणाची वाट पाहत होते. तो पूर्ण होताच आनंदाची लाट पसरली. तसेच, चाहत्यांकडूनही रामचरण आणि उपासनावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
उपासनाच्या गरोदरपणाबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत्या. राम चरणची पत्नी उपासना यांनी रुग्णालयात भेट दिल्यानंतर त्यात वाढ झाली. अलीकडेच राम चरण आणि उपासना यांनी त्यांच्या लग्नाचा 11 वा वाढदिवस साजरा केला. राम चरण आणि उपासना 14 जून 2012 रोजी विवाहबंधनात अडकले. आता या जोडप्याच्या घरात छोट्या परीचे आगमन झाले आहेत.
हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये उपासनाने मुलीला जन्म दिला आहे. ही बातमी आल्यानंतर राम चरण आणि उपासना यांच्या संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. बाळाची पहिली झलक पाहण्यासाठी राम चरणचे चाहतेही खूप उत्सुक आहेत. या जोडप्याने डिसेंबर 2022 मध्ये सर्वांना ही आनंदाची बातमी दिली होती.
'आरआरआर'ने रामचरणला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. आगामी काही दिवसांत राम चरण तामिळ-तेलुगू द्विभाषिक 'गेम चेंजर'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणीही काम करत आहे. याशिवाय, या अभिनेत्याकडे दिग्दर्शक बुची बाबू सना यांचा एक चित्रपट आहे.