ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. यावेळी तीने आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांच्या विरोधात एक वक्तव्य केले आहे. कांग्रेस नेता नवजोत सिंह सिद्धू हे पंजाबी राजकारणाचे राखी सावंत असल्याचे वक्तव्य राघव चढ्ढा यांनी केले. याविषयी कळल्यानंतर संतप्त राखीने राघव यांना चेतावनी दिली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत एक मोठे वक्तव्य केले होते. हे पाहता आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर निशाना साधत त्यांना पंजाबच्या राजकारणाची राखी सावंत म्हटले. जेव्हा राखी सावंतला हे कळले तेव्हा तिने राघव यांना सुनावले आणि म्हणाली,
"राघव चड्ढा, माझ्यापासून आणि माझ्या नावापासून दूर राहा. मिस्टर चड्ढा, तुम्ही स्वतः बघा, ट्रेंडिंगमध्ये येण्यासाठी तुम्हाला माझे नाव हवे होते. जर तुम्ही माझ्या नावाचा वापर केलात तर मी तुमचा चढ्ढा उतरवेल, असे राखीने राघव यांना सडेतोड उत्तर दिले.