Rakhi Sawant Team Lokshahi
मनोरंजन

Rakhi Sawant झाली गर्भवती, फ्लोन्ट केले बेबी बंम्प

राखीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

Published by : prashantpawar1

प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हिला लोक फक्त ड्रामा क्वीन (Drama Queen) म्हणतात असं नाही. ती जिथे जाते तिथे एक वेगळे वातावरण निर्माण करते. ज्यामुळे लोकांचे मनोरंजनात प्रचंड भर पडते. अशा परिस्थितीत राखीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होणे निश्चितच आहे. दरम्यान या राखीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

खरं तर व्हिडिओमध्ये राखी सावंत बनावट बेबी बंपसोबत (Baby bump) दिसत आहे. खरी गंमत म्हणजे राखी सावंतने दोन फुग्यांसह हा बेबी बंप तयार केला आहे. व्हिडिओमध्ये राखी सावंत बनावट बेबी बंपसह जिम आउटफिट परिधान करताना दिसत आहे. यादरम्यान तिची एक मैत्रीण ड्रामा क्वीनसोबत दिसत आहे.

पुन्हा एकदा राखी सावंत लोकांना हसवण्यात यशस्वी ठरलीय. जिमबाहेर उपस्थित लोक राखीसोबत मस्ती करताना दिसले. दरम्यान राखी म्हणाली की देव आणि पैगंबरांनी मला सांगितले आहे की, मी एका मसिहाला जन्म देणार जो पापांना धडा शिकवेल. राखी लोकांसोबत नेहमीच मस्ती करते याच दरम्यान तिच्या मैत्रिणीने फुगा फोडला. व्हिडीओमध्ये राखी सावंत चाहत्यांसोबत फोटो क्लिक करतानाही दिसत आहे.

याआधी देखील राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री रस्त्यावरचा कचरा साफ करताना दिसत होती. रस्त्यावर पसरलेला कचरा पाहून राखी फावडे आणते आणि साफ करते. राखीची ही स्टाईल पाहून पापाराझी तिथे जमतात आणि म्हणतात की निवडणूक येणारच. याला उत्तर देताना राखी लगेच उत्तर देताना म्हणते की अशा निवडणुकीत माझा कोणत्याही पक्षावर अजिबात विश्वास नाही.

म्हाडाचा कारभार आता होणार पेपरलेस; ई-ऑफिस प्रणाली लवकरच सुरू

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 6 नोव्हेंबरला मुंबईत सभा

Satara: जिल्ह्यात 215 जणांचे अर्ज; चुरस वाढली

राजकीय पक्षांना बंडखोरीचं ग्रहण; नाराजांकडून थेट अपक्ष अर्ज

नवी मुंबईच्या खारघरमधून 27 लाखांचं ड्रग्ज जप्त