मनोरंजन

Oppenheimer: हॉलीवुड चित्रपट ओपेनहायमरचा राजेश्वरीने केला निषेध!

Published by : Team Lokshahi

‘ओपनहायमर’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. 21 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याने पहिल्या तीन दिवसांत 50 कोटींवर कमाई केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ख्रिस्तोफर नोलन यांनी केले आहे. अणुबॉम्बचे जनक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ ज्युलियस रॉबर्ट यांच्यावर हा चित्रपट आहे. मात्र या चित्रपटातील काही दृश्यांवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘फँड्री’ फेम शालू अर्थात अभिनेत्री 'राजेश्वरी खरात' हिने यावर पोस्ट शेअर करत हिंदूंचा अपमान करणाऱ्या या चित्रपटाचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे.

‘ओपनहायमर’ चित्रपटाविषयी राजेश्वरी खरात हिने फेसबुकवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “हिंदू-मुस्लिम, धर्म, जात-पात, रंग इत्यादी विषयांमध्ये लोक एकत्रित येऊन दंगे मोर्चे आणि काय काय करतात. पण या गोष्टींमुळे आपण आपल्याच देशातील लोकांचा द्वेष करत आलोय. आज बाहेर देशातील काही लोकांनी आपल्या धार्मिकतेचा अपमान केला आहे. यावर कोणी जास्त काही बोलेनात. सर्वांना विनंती आहे की, या प्रकरणाचा तीव्र निषेध करा आणि या सिनेमाचा योग्य तो निर्णय लागावा ही जबाबदारी सरकारने लवकरात लवकर घ्यावी”,असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

राजेश्वरीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेता स्वप्निल राजशेकर यांनी राजेश्वरीच्या पोस्टवर कमेंट करत 'ओपेनहायमर' मधील दृश्यांचा समर्थन केला आहे सिनेमातल्या एका दृश्याने पवित्र बाधा यावे इतके श्रीभगवदगीता लेचीपीची नाही. विश्वासाचं ज्ञान त्यात आहे. असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी