मनोरंजन

'पुष्पा 2' मधील अल्लू अर्जुनचा दमदार लूक रिलीज

चाहत्यांसाठी खुशखबर येत आहे. 'पुष्पा 2'चे शूटिंग सुरू झाले असून यातून अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूकही समोर आला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच चित्रपट समीक्षकांचेही भरभरून प्रेम मिळाले. 'सामी सामी' आणि 'ऊं अंटावा' सारख्या गाण्यांपासून ते 'पुष्पा, झुकेगा नही...'पर्यंत 'पुष्पा'ची प्रेक्षकांची क्रेझ अद्यापही कायम आहे. तेव्हापासून चाहते 'पुष्पा'च्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. आता चाहत्यांसाठी खुशखबर येत आहे. 'पुष्पा 2'चे शूटिंग सुरू झाले असून यातून अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूकही समोर आला आहे.

पुष्पा 2 च्या शूटिंगला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. सिनेमॅटोग्राफर मिरोस्लाव कुबा ब्रोझेक यांनी 'पुष्पा: द रुल' म्हणजेच 'पुष्पा 2' मधील अल्लू अर्जुनचा पहिला फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अल्लू अर्जुन खूपच डिसेंट दिसत आहे. हे शेअर करत कुबा ब्रोजेकने अ‍ॅडवेंचर सुरू झाले आहे. आयकॉन स्टार अल्लू अर्जुनचे आभार. पुष्पा, असे लिहीले आहे. 'पुष्पा 2'मधील अल्लू अर्जुनचा लूक रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहते अभिनेत्याच्या लूकचे कौतुक करताना थकत नाही

'पुष्पा: द राइज' 2021 मध्ये रिलीज झाला आणि त्या वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 350 कोटींहून अधिक कमाई केली. 'पुष्पा' संपूर्ण भारतामध्ये प्रचंड यशस्वी ठरला. नुकताच लॉकडाऊन उघडल्यानंतर 'पुष्पा'ने भरभक्कम कमाई केली, ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अल्लू अर्जुनला पॅन इंडियाचा स्टार बनवण्यात या चित्रपटाचा मोठा हात आहे. सुकुमार 'पुष्पा 2' दिग्दर्शित करत आहेत. रश्मिका मंदान्ना, फहद फासिल आणि विजय सेतुपती देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण