मनोरंजन

निर्माते, दिग्दर्शक महेश टिळेकर यांची दिग्गज मल्याळम कलाकारांशी भेट

सिनेमाचा विषय आणि सहज अभिनय करणारे कलाकार यामुळे मल्याळम सिनेमा जगभर पाहिला जातो.मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज कलाकारांच्या बरोबर काम केलेले निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांचे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांशी मैत्री आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सिनेमाचा विषय आणि सहज अभिनय करणारे कलाकार यामुळे मल्याळम सिनेमा जगभर पाहिला जातो.मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज कलाकारांच्या बरोबर काम केलेले निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांचे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांशी मैत्री आहे. नुकतेच त्यांनी केरळ मध्ये मल्याळम सिनेमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या काही कलाकारांच्या घेतलेल्या भेटीचे फोटो फेसबुक वर पोस्ट केले आहेत.

छोट्या दुकानात टेलरिंग काम करून पुढे मल्याळम सिनेमांसाठी कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम करत अभिनयाला सुरुवात केलेले लोकप्रिय जेष्ठ कलाकार इंद्रन तसेच छोट्या मोठ्या कार्यक्रमातून मिमिक्री ,निवेदन करून मग मल्याळम सिनेमांतून कधी विनोदी तर कधी गंभीर भूमिकांमधून प्रसिद्ध असलेले अभिनेते सूरज,ज्यांना एक नॅशनल अवॉर्ड आणि २० केरळ सरकारचे उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाले आहेत त्यांची भेट महेश टिळेकर यांनी घेऊन चित्रपटसृष्टी बाबत चर्चा केली. जय भीम या बहुचर्चित चित्रपटातून लक्षवेधी भूमिका साकारणारी मल्याळम अभिनेत्री लिजोमोल जोस हिच्याशी पण महेश टिळेकर यांनी संवाद साधला.

महेश टिळेकर यांच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या "हवाहवाई" या चित्रपटात द ग्रेट इंडियन किचन या मल्याळम सिनेमातून समर्थ अभिनयाचं दर्शन घडवणारी अभिनेत्री नीमिषा सजयन ही मराठीत प्रथमच पदार्पण करीत आहे.

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका