बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानं 2018 मध्ये अमेरिकन सिंगर निक जोनससोबत जोधपुरमध्ये लग्न केलं. लग्नानंतर प्रियांका पती निक जोनससोबत अमेरिकेत शिफ्ट झाली. ते दोघं लॉस एंजलिसमध्ये राहतात. लॉस एंजिलिसमधल्या ज्या स्वप्नांच्या घरात राहत होते, त्यातून अखेर बाहेर पडले आहेत.
पेज सिक्सच्या एका रिपोर्टनुसार, कपलनं सांगितलं की ते घर आता राहण्यासारखं राहिलं नाही. वॉटर डॅमेजसंबंधित समस्येमुळे भिंतीला ओल पकडू लागलं आहे. त्यामुळे घरात पपडी येऊ लागली आहे. त्यामुळे त्यांनी हे घर खाली केलं आहे आणि ज्या सेलरकडून त्यांनी हे घर घेतलं होतं त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई देखील करणार आहेत. त्याचं कारण त्यांनी सांगितलं आहे की अशा घरात राहणं आरोग्यासाठी चांगलं नाही. तक्रारीनुसार, 2019 मध्ये घर खरेदी केल्यापासून हळू-हळू अनेक समस्या उद्भवू लागल्या. सगळ्यात आधी पूल आणि मग स्पा एरियामध्ये अनेक समस्या सुरु झाल्या. त्यानंतर घरात आणि बार्बीक्यू एरियात वॉटरप्रूफिंगची समस्या सुरु झाली. घरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून पाणी गळती होऊ लागली होती.
लॉस एंजिलिसमध्ये प्रियांका आणि निकचं अत्यंत आलिशान घर आहे. सात बेडरुम्स, नऊ बाथरुम्स, तापमान नियंत्रित ठेवणारं वाइन सेलर, शेफचं किचन, होम थिएटर, बोलिंग ॲली, स्पा आणि स्टीम शॉवर, जिम आणि बिलियर्ड्स रुम अशा सर्व सुविधा या आलिशान घरात आहेत. 2019 मध्ये प्रियांका-निकने हे घर तब्बल 20 दशलक्ष डॉलर्सना विकत घेतलं होतं. आवारातील वॉटरप्रूफिंग समस्यांमुळे बुरशी तयार होणे आणि त्यासंबंधीच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याच वेळी डेकवरील बार्बेक्यू परिसरातसुद्धा पाण्याची गळती होऊ लागली, असंही त्यांनी तक्रारीत सांगितले आहे.