मनोरंजन

prithvik pratap: पृथ्वीक प्रतापच्या स्वप्नपूर्तीला आलं उधाणं! आधी हक्काचं घर आणि आता आलिशान गाडी

या कार्यक्रमातील कलाकार पृथ्वीक प्रताप हा सध्या चर्चेत येताना दिसत आहे. त्याचं नुकतचं एक मराठी सॉन्ग आलं आहे आणि त्याचसोबत पृथ्वीकने नवीन आलिशान असं त्याचं स्वतःच घर घेतलं आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील प्रत्येक जण यशाचा टप्पा गाठत आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने आपल्या स्वप्नपूर्तीची सुरुवात करायला सुरु केलं आहे. हे सर्व कलाकार महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले आहेत आणि आपली ओळख निर्माण करू लागले आहेत. प्रत्येक कालाकाराचा स्वतःचा असा वेगळा आणि मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. तर महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम आता लोकप्रिय कार्यक्रमाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर येतो असं म्हणायला काही हरकत नाही. या कार्यक्रमाने चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केलेले आहे.

या कार्यक्रमातील कलाकार पृथ्वीक प्रताप हा सध्या चर्चेत येताना दिसत आहे. त्याचं नुकतचं एक मराठी सॉन्ग आलं आहे आणि त्याचसोबत पृथ्वीकने नवीन आलिशान असं त्याचं स्वतःच घर घेतलं आहे. यादरम्यान नवीन घरासाठी त्याला त्याला अनेक जणांकडून शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. स्वप्न पुर्ण करण्याच्या यादीत पृथ्वीकने आणखी एक गोष्ट जोडली आहे. यावेळी पृथ्वीकने आलिशान आणि लक्झरी कार खरेदी केली आहे. या कारसोबतचे काही सुंदर फोटो पृथ्वीकने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यामध्ये पृथ्वीक त्याच्या कुटुंबासह आनंद व्यक्त करताना दिसत आहे. पृथ्वीकने खरेदी केलेल्या कारचं नाव 'किआ सेल्टोस' हे आहे. तर ही कार 12 ते 18 लाख इतकी असण्याची शक्यता आहे. पृथ्वीकने सोशल मीडियावर पोस्ट करतं,' पाहिलेल्या स्वप्नांची यादी पूर्ण करण्याच्या प्रवासाला थोडी गती मिळावी म्हणून संयमाची चार चाके जोडतोय. आशिर्वाद आणि प्रेम असू द्या' असे कॅप्शन दिले आहे.

त्याचसोबत त्याच्या या पोस्टवर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील त्याच्या मित्रपरिवाराकडून अभिनंदन केले जात आहे. यामध्ये प्राजक्ता माळी, समीर चौगुले, रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात, ओंकार राऊत, प्रियदर्शिनी इशा डे आणि इतर मराठी कलाकारांकडून अभिनंदन केले जात आहे. तर चाहत्यांकडून देखील शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती