मनोरंजन

टायगर श्रॉफच्या‘वंदे मातरम्’गाण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक

Published by : Lokshahi News

अभिनेता टायगर श्रॉफने त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या फिटनेस, डान्स आणि स्टंटने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. टायगर श्रॉफच्या डान्स आणि फिटनेसचं कायमचं चाहत्यांकडून आणि बॉलिवूड सेलिब्रिटींकडून कौतुक केलं जातं. मात्र यावेळी टायगरच्या एका नव्या टॅलेंटचं सर्वत्र कौतुक होतयं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी देखील टायगरच्या या नव्या कौशल्याचं कौतुक केलं आहे.

भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत टायगर श्रॉफचं 'वंदे मातरम्'हे गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं. टायगर श्रॉफने गायलेल्या या सुरेल गाण्यात त्याच्या आवाजाच्या जादूसोबतच त्याचा दमदार डान्स पाहायला मिळतोय. स्वातंत्र्यदिनी टायगरने हे गाणं ट्विटरवर शेअर केलं होतं. एक पोस्ट लिहित त्याने नरेंद्र मोदींना देखील या पोस्टमध्ये टॅग केलं होतं. या पोस्टमध्ये तो म्हणाला , "वंदे मातरम्…हे केवळ शब्द नाहीत, तर भावना आहेत. अशा भावना ज्या आपल्याला आपल्या राष्ट्रासाठी योगदान देण्यासाठी प्रेरित करतात. या स्वातंत्र्यदिनी १३० कोटी भारतीयांसाठी एक छोटासा प्रयत्न"

टायगर श्रॉफच्या या ट्वीटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेचच प्रतिक्रिया देत त्याचं कौतुक केलंय. मोदी ट्वीटमध्ये म्हणाले, "क्रिऐटिव्ह प्रयत्न. वंदे मातरम् बद्दल तू जे बोललास त्याच्याशी पूर्णपणे सहमत" असं मोदी म्हणाले.

तर मोदींची ही प्रतिक्रिया पाहून टायगर श्रॉफला प्रचंड आनंद झाला आहे. "तुमच्याकडून असं कौतुक होणं हे माझ्यासाठी भाग्य आहे. मी अत्यंत भारावून गेलो असून कृतज्ञ आहे" असं म्हणत टायगरने आनंद व्यक्त करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा