मनोरंजन

Premachi Goshta star pravah: 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत आणखी एक ट्विस्ट, मिहीकाच्या पात्रात दिसणार 'ही' अभिनेत्री...

स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेला युवकांपासून ते वयस्करांपर्यंत प्रत्येक वयोगटातील लोकांचा चाहतावर्ग मिळाला आहे. सगळं काही सुरळीत चालत असताना या मालिकेत एक नवीन ट्विस्ट आला आहे.

Published by : Team Lokshahi

स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेला युवकांपासून ते वयस्करांपर्यंत प्रत्येक वयोगटातील लोकांचा चाहतावर्ग मिळाला आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रासह ही मालिका प्रत्येकाच्या आवडीची ठरली आहे. या मालिकेत तेजश्री प्रधान, शुभांगी गोखले, राज हंचनाळे तसेच अपूर्वा नेमळेकर आणि संजीवनी जाधव यांसारखे रुजलेले कलाकार पाहायला मिळत आहेत. या कलाकारांच्या जबरदस्त पात्रासह त्यांचा तगडा अभिनय या मालिकेला उत्कृष्ट बनवत आहे. मालिकेत येणारे वेगवेगळे ट्विस्ट या मालिकेची लोकप्रियता वाढवतात त्यामुळे या मालिकेचा चाहतावर्ग ही मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहे. सगळं काही सुरळीत चालत असताना या मालिकेत एक नवीन ट्विस्ट आला आहे.

तो असा आहे की, या मालिकेतील मिहीका हे पात्र साकारणारी मृणाली शिर्के हीने 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेला राम राम केला आहे. मृणाल शिर्केने ही मालिका सोडल्याची माहिती समोर आली आहे. तर तिच्या जागी एका अशा अभिनेत्रीची रिप्लेसमेंट केली आहे जीचे 'स्टार प्रवाह 'या वाहीनीसोबत जुने नाते आहे. या आधीसुद्धा ही अभिनेत्री स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा' या मालिकेत पाहायला मिळाली आहे. त्याचसोबत तिने इतर मालिकांमध्ये देखील काम केले आहे. लोकप्रिय मालिका 'कन्यादान', 'वैजू नंबर वन', आणि झी मराठीवरील सुप्रसिद्ध मालिका 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत काम ही अभिनेत्री करून झाली आहे. मृणाली शिर्केच्या जागी आता 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत मिहीकाच्या भूमिकेत अमृता बने ही पाहायला मिळणार आहे.

पण प्रेक्षांनी अजून तरी मिहीका या पात्रासाठी अमृता बनेला स्विकारलेलं नाही. चाहत्यांकडून या पात्रासाठी फारशी पसंती मिळालेली नाही. यादरम्यान आता प्रेक्षक या पात्रासाठी अमृता बनेला लवकर स्विकारतील की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. त्याचसोबत या नव्या पात्रासोबतच आणखी कोणते ट्विस्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहेत याकडे सर्वांची उत्सुकता लागलेली आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी