प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून प्रवीण तरडे यांना यांनी मराठीत अनेक चित्रपट आणले आणि ते गाजले ही ‘धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे’, ‘सरसेनापती हंबीरराव’ असे त्यांचे एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले. प्रवीण तरडे सध्या त्यांच्या पत्नी सोबत लंडनला निवांत वेळ घालवत आहेत.
लंडनला गेल्यानंतर त्यांनी तेथील बाजारपेठेत जाऊन तिथल्या मराठमोळ्या शेतकऱ्याची भेट घेतली. त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ तरडे यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना प्रवीण तरडे यांनी, ‘लंडन मधील वेस्टर्न इंटरनॅशनल भाजी आणि फळ मार्केट वर मराठी शेतकऱ्यांचा पगडा.. जय महाराष्ट्र’ असं कॅप्शन दिलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.
या व्हिडीओमध्ये त्यांनी ही बाजारपेठ कशी आहे आणि यात मराठी शेतकऱ्यांनी कशाप्रकारे आपलं वर्चस्व निर्माण केलंय हे सांगितलं आहे. तसेच मराठमोळे शेतकरी सचिन कदम आणि निरज रत्तू यांची ओळख करून दिली आहे. यापैकी सचिन कदम हे मुळचे रत्नागिरीतील चिपळूण येथील रहिवासी आहेत तर निरज रत्तू हे पुण्यातील शिरूर येथील रहिवासी आहेत.