Akshay Kumar Team Lokshahi
मनोरंजन

Samrat Prithviraj : अक्षयचा 'पृथ्वीराज' UP मध्ये करमुक्त ?

Published by : prashantpawar1

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) यांचा 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच लोकांच्या मनात तग धरून आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी प्रोग्रॅम करत आहेत. दरम्यान 2 जून रोजी चित्रपटाच्या टीमने लखनऊमध्ये एक विशेष स्क्रीनिंग आयोजित केली होती. ज्यामध्ये यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Aadityanath) हे देखील उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण चित्रपट पाहिला असून यासह यूपीमध्ये चित्रपट करमुक्त (Tax Free) करण्यात आला आहे. आम्ही घोषणा करतो की 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट उत्तर प्रदेशमध्ये करमुक्त केला जाईल जेणेकरून सामान्य माणूस देखील हा चित्रपट पाहू शकेल असं ते म्हणाले. योगी आदित्यनाथ आपल्या सहकाऱ्यांसह मोहम्मद घोरीविरुद्ध लढलेले राजपूत शासक पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावरील बायोपिकच्या विशेष स्क्रीनिंगला उपस्थित होते. अक्षय कुमार, मानुषी छिल्लर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्र प्रकाश द्विवेदी (Chandra Prakash Dviwedy) हे देखील यावेळी उपस्थित होते.

यादरम्यान अक्षय कुमार मंचावर आला आणि म्हणाला की 'हा चित्रपट पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. योगीजी यांचे मी खास आभार मानतो की त्यांनी हा चित्रपट पाहण्यासाठी आपला अमूल्य वेळ दिला. अनेकांनी योग्य वेळी टाळ्या वाजवून आम्हाला प्रेरित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी जास्त वेळ घेणार नाही कारण वेळ खूप मौल्यवान असतं.यानंतर त्यांनी यूपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना स्टेजवर येऊन काहीतरी बोलण्याची विनंती केली.

वायू प्रदूषण आणि उष्णतेमुळे ब्रेन स्ट्रोकची प्रकरणे वाढली; जगात अशा लोकांची संख्या पोहोचली 1.19 कोटींवर

Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

IND vs BAN: मोठ्या लक्ष्यासमोर बांगलादेशची दमदार सुरुवात; भारत विजयापासून सहा विकेट्सनी लांब

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर