मनोरंजन

Prathmesh Parab Engagement : 'व्हॅलेंटाईन्स डे'चा मुहूर्त अन् दगडूला मिळाली त्याची खरी प्राजू

'व्हॅलेंटाईन्स डे'च्या दिवशी अभिनेता प्रथमेश परब आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर यांचा साखरपुडा पार पडला आहे.

Published by : Team Lokshahi

'व्हॅलेंटाईन्स डे'च्या दिवशी अभिनेता प्रथमेश परब आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर यांचा साखरपुडा पार पडला आहे. अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर प्रथमेश आणि क्षितिजाने संसार थाटण्याचा निर्णय घेतला. तसेच व्हॅलेंटाईन्स डे हा प्रथमेशसाठी खास असून याबद्दल प्रथमेशनेच भाष्य केलं होतं. त्यामुळे त्यांनी व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशीच साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. आता लवकरच प्रथमेश आणि क्षितीजा लग्नबंधनात अडकणार आहेत.

प्रथमेश परब आणि क्षितिजाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत साखरपुडा आणि लग्नाची तारीख जाहीर केली होती. 14 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांचा साखरपुडा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर लगेचच 10 दिवसांनी 24 फेब्रुवारीला ते दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. अभिनेता प्रथमेश परबसाठी व्हॅलेंटाईन्स डे का खास आहे, यासंदर्भात त्याने खास पोस्टदेखील शेअर केली होती.

त्याने लिहिलं होतं,'व्हॅलेंटाईन्स डेचं आमच्या रिलेशनमध्ये विशेष स्थान आहे. म्हणजे आमचा या कंसेप्टवर विश्वास नाही. पण कधीकधी खास न वाटणाऱ्या गोष्टी खूप खास बनतात. 14 फेब्रुवारी 2020 रोजी मी क्षितिजाची व्हॅलेंटाईन डे स्पेशल सीरिज पाहिली आणि तिला मेसेज केला होता. 14 फेब्रुवारी 2021 रोजी आम्ही रिलेशनमध्ये आलो. 14 फेब्रुवारी 2022 रोजी आमच्या रिलेशनला एक वर्ष पूर्ण झालं. 14 फेब्रुवारी 2023 रोजी आम्ही आमचं रिलेशन जगजाहीर केलं. त्यामुळे आम्ही 14 फ्रेब्रुवारी रोजी साखरपुडा करणार आहोत. व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभमुहूर्तावर प्रथमेशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत साखरपुड्याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. 'आमचा व्हॅलेंटाईन डे' असं म्हणत प्रथमेशने साखरपुड्याचे फोटोज शेअर केले आहेत. चाहत्यांनी या जोडीला भरभरुन शुभेच्छादेखील दिल्या.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय