मुंबई : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. याबाबत आता नवनवीन खुलासे होत आहे. याचे विधानसभेतही आज पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच, भाजप नेते प्रसाद लाड यांनी मोठा आरोप केला आहे. बॉलिवूडमधील एका कलाकाराशी झालेल्या वादानंतर बॉलिवूडमध्ये देसाईंच्या एनडी स्टुडिओत शूटिंगवर बहिष्काराला सुरुवात झाल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे.
बॉलिवूडमधील एका कलाकाराशी झालेल्या वादानंतर बॉलिवूडमध्ये देसाईंच्या एनडी स्टुडिओत शूटिंगवर बहिष्काराला सुरुवात झाल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केलाय. नितीन देसाईंवर बहिष्काराला तो कलाकार कारणीभूत असल्याचा आरोप लाड यांनी केला. बॉलिवूडच्या त्या कलाकाराची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केलीय. बॉयकॉट एनडी स्टुडिओ मोहिम चालवणारी ती बॉ़लिवू़डमधील टोळी कोणती, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. यामुळे सिनेसृष्टी पूर्णपणे हादरली आहे. नितीन देसाई यांनी मराठी माणसाचे नाव सातासमुद्रापार नेले. त्यांनी केलेलं वेगवेगळे चित्रपट असतील अनेक सुपरहिट चित्रपट भव्य देखावे उभे केले. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीवेळी 20 तासात भव्य सेट उभा केला. माझ्या त्यांच्यासोबत मागील काळात 3 ते 4 बैठक झाल्या होत्या. त्यांनी 150 कोटी कर्ज आहे आणि व्याजावर व्याज लावून 250 कोटी कर्ज झाले असल्याचे सांगितले होते. माझ्याकडे ते मला वाचवा असे बोलत होते. मला आयुष्यभर हे शल्य राहील कि मी काही मदत करू शकलो नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडूनसुद्धा कर्ज भरण्यासाठी 3 महिन्याचे एक्सटेंन्टन दिल होते पण ते शेवटी हरले, असेही त्यांनी म्हंटले आहे.
कर्जासाठी नितीन देसाईंना मानसिक त्रास देण्यात आला. या त्रासाला कंटाळून त्यांना मृत्यूला कवटाळले. त्यांना कशा पद्धतीने टॉर्चर करण्यात आले? कसा त्रास देण्यात आला याबाबत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे. असे अनेक नितीन देसाई पाईपलाईनमध्ये आहेत. मनोहर सपकाळ हा सुद्धा अशाच मानसिकतेत होते. त्यांची आत्महत्या चिंता करणारी आहे, असेही त्यांनी म्हंटले. ते एकटे मरत नाही तर त्याच्याबरोवर सर्व कामगार आणि कलाकार असे पाठीशी असणारे अनेकजण मरत असतात. हा स्टुडिओ जप्तीपासून वाचवण्यात यावं, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.