Prajakta Mali Team Lokshahi
मनोरंजन

प्राजक्ता माळीने आजी आजोबांसोबत पाहिला 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपट

Sarsenapati Hambirrao हा चित्रपट पहाण्यासाठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या आजी आजोबांबरोबर गेली होती.

Published by : shamal ghanekar

"आज आपला भगवा मातीत नाही, गनिमाच्या छातीत रोवायचा" सांगत महाराष्ट्राचा महासिनेमा 'सरसेनापती हंबीरराव' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. या सिनेमा रसिक-प्रेक्षकांचे मने जिंकून घेतली आहेत. "सरसेनापती हंबीरराव" हा चित्रपट पहाण्यासाठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) तिच्या आजी आजोबांबरोबर गेली होती. तिने आजी आजोबांबरोबरचा एक फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

"सरसेनापती हंबीरराव" (Sarsenapati Hambirrao) या चित्रपटाचे कौतुक करणारी एक पोस्ट तिने तिच्या इन्स्टाग्राम आकांऊटवरून शेअर केली आहे. प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये लिहिले की, A day with “आजी-आजोबा” आणि आम्ही “सरसेनापती हंबीरराव” पाहिला. कौतुकाला शब्द अपूरे पडतील, इतका अप्रतिम झालाय चित्रपट.

तिने पुढे लिहिले की, प्रविण दादा तू भारी आहेस- विषय कट.२.३० तासात तू दोन महाराजांची, त्यांच्या सरसेनापतीची, अंतर्गत राजकारणाची, स्वराज्याची गोष्ट; ज्या हुशारीनं दाखवलीस त्याला तोडच नाही.तुझ्यातला प्रेमळ, समंजस, दूरदृष्टी असणारा गोड माणूस लेखनात उतरला.. आणि त्यानी आम्हांला कितीतरी शिकवलं. त्यासाठी किती धन्यवाद देऊ? #केवळप्रेम Mahesh Limaye नेहमीप्रमाणे कडक कामगिरी.

प्राजक्ता माळीही सध्या 'रानबाजार' (RaanBaazaar) या सिरीजमुळे चर्चेत आहे. या सिरीजमध्ये प्राजक्ताचा बोल्ड लूक पाहायला मिळणार आहे. काहीनी तिला ट्रोलही करण्यात आले होते. यावेळी तिनी वेगळी भूमिका निवडली आहे.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण