मनोरंजन

RRR सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती; तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल

Published by : Lokshahi News

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच अनेक सिनेमांचे प्रदर्शनाला सुरुवात झाली. दरम्यान, 'आरआरआर' हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली अनेक अडचणींचा सामना करत आहेत. या सिनेमाविरोधात तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'आरआरआर' या सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आली आहे. या सिनेमावर दोन स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा आरोप करण्यात आला आहे.

पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने 'आरआरआर' सिनेमाविरोधात ही जनहित याचिका दाखल केली असून, सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. सिनेमात अनेक ऐतिहासिक तथ्यांची चुकीच्या पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. याशिवाय सेन्सॉर बोर्डाने या बाबीकडे लक्ष देऊन योग्य ती कठोर कारवाई करावी,अशी मागणी या विद्यार्थांनी केली आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी