प्रसिद्ध अभिनेत्री आणि लॉकअप स्टार पूनम पांडे यांचे निधन झाले आहे. त्यांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याचे सांगण्यात येत आहे. अलीकडेच त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर ही माहिती देण्यात आली आहे. पूनम पांडेच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. वास्तविक, अभिनेत्रीच्या व्यवस्थापकाने खुलासा केला आहे की गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी लढा दिल्यानंतर 1 फेब्रुवारीच्या रात्री तिचा मृत्यू झाला. पूनमने तिच्या मूळ गावी कानपूरमध्ये अखेरचा श्वास घेतल्याचेही टीमने सांगितले आहे.
पूनम पांडे ही प्रसिद्ध मॉडेल होती. 2011 मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप फायनल मॅचच्या आधी पूनम सर्वाधिक चर्चेत आली होती. भारताने अंतिम सामना जिंकला तर मी स्ट्रिपिंग करेन, असं तिने जाहीर केलं होतं. तिच्या या व्हिडीओची त्यावेळी सर्वाधिक चर्चा झाली होती. पूनमच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ या रिॲलिटी शोमध्ये झळकली होती.
पूनम मांडेने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे,"आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे. कॅन्सरशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली. संपर्कात आलेल्या सर्वांनाच तिने प्रेम दिलं आहे. आता यातून बाहेर पडायला आम्हाला थोडा वेळ द्यावा एवढी विनंती". पूनमच्या पोस्टवर हे अकाऊंट हॅक झालं आहे, ही पोस्ट खोटी ठरू देत अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
पूनम पांडेने 2013 मध्ये नशा या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर 'द जर्नी ऑफ कर्मा' आणि 'मालिनी अँड कंपनी', 'दिल बोले हडिप्पा' अशा अनेक सिनेमांत तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवली. छोट्या पडद्यावरील 'आशिकी तुमसेही', 'नादानिया', फिअर फॅक्टर : खतरो के खिलाडी या शोमध्ये देखील ती झळकली होती.