मनोरंजन

Oscar शर्यतीत आणखी एका भारतीय चित्रपटाची एण्ट्री

Published by : Lokshahi News

सिनेसृष्टीत जगभरातील प्रेक्षकांच्या नजरा ऑस्कर या पुरस्कार सोहळ्याच्या दिशेने लागलेल्या असतानाच भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. यंदाच्या ऑस्कर शर्यतीत आणखी एका भारतीय चित्रपटाला एण्ट्री मिळाली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता सुर्या याचा 'सोहराई पोटरु' हा चित्रपट भारतातर्फे अधिकृतरित्या ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आला आहे. 'सोहराई पोटरु' हा एक तमिळ चित्रपट आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियाद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन या विभागात नामांकन मिळवण्यासाठी 'सोहराई पोटरु' प्रयत्न करणार आहे. लक्षवेधी बाब म्हणजे हा पुरस्कार पटकावण्यासाठी जगभरातील तब्बल ३६६ चित्रपट या स्पर्धेत उतरले आहेत. यापैकी केवळ पाचच चित्रपटांना अंतिम पाचमध्ये जागा मिळेल. अंतिम पाच चित्रपटांची नामांकन यादी येत्या १५ एप्रिल रोजी जाहीर केली जाणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुधा कोंगरा यांनी केलं आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्या आणि अपर्णा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

राज्यात आजपासून स्वच्छता सेवा पंधरवडा; गिरगाव चौपाटीवरून सुरू होणार मोहीम

अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पोलिसांकडून बंद; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस