विकास मिरगणे, नवी मुंबई
कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईज ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालकांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. सकाळी १० वाजेपर्यंत खालापूर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईज ग्रुपच्या तक्रार नोंदवली होती. यानंतर ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईज ग्रुपच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली आहे.
खालापूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील ९ जणांचे एक पथक तपासकामी नियुक्त करण्यात आले आहे. यात एक पोलीस निरीक्षक, ३ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि ४ पोलीस अमंलदारांचा समावेश आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने १५ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. तर ईसीएल फायनान्स कंपनी, एडलवाईज ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस बजावली आहे