सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं आहे.देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक माहितीनुसार, नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केली. एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई दिसून आले. कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. स्टुडिओ सुरक्षा रक्षकाने पोलिसांनी माहिती दिली की, नितिन देसाई अनेकदा स्टुडिओत यायचे आणि रात्री उशीरा किंवा सकाळी जायचे ते आज बाहेर आले नाही म्हणुन सुरक्षा रक्षक पहायला गेला असता त्यांनी गळफास घेतल्याचे दिसले. सकाळी सुरक्षा रक्षकाने पोलिसांना फोन करुन माहिती दिली.
गेल्या २० वर्षांत महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमासाठी मंच उभारणे, सजावट करण्याचे काम नितीन देसाई यांनी स्वत: केलं आहे. शिवसेनेच्या मनोहर जोशींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तेव्हा त्यांनी स्टेजची सजावट केली. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीच्या दिवशीसुद्धा त्यांनी स्टेज तयार केला होता. तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हाही मंचाची संपूर्ण सजावट नितीन देसाई यांनी केली होती.
नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. १९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. २००५ मध्ये नितीन देसाईंनी मुंबईजवळील कर्जत येथे एनडी स्टुडिओ सुरु केला.