'सापळा' हा सिनेमा 26 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे रसिकांमध्ये या चित्रपटाविषयीची उत्सुकता ताणली गेली आहे. दोन मिनिटांच्या या ट्रेलरमधून एका खुनाची चर्चा होत असल्याचे दिसते. दोन लेखक, एक वर्कशॉप, रक्ताचा वास, चेहऱ्यावरील भीती, खोदलेली कबर अशा गोष्टी यातून समोर येतात आणि काहीतरी वेगळे आणि भयाण समोर येणार याची खुणगाठ प्रेक्षक बांधतो. दर्जेदार अभिनय आणि अर्थगर्भ गाणे यातून हा चित्रपट निर्मिती मुल्यांची एक चुणूक देवून जातो.
बहुप्रतीक्षित मराठी थ्रिलर महाराष्ट्रभर २६ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. त्याच्या नवीन ट्रेलरमुळे रसिकांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणली गेली आहे. दोन मिनिटांच्या या ट्रेलरमधून एका गूढ खुनाची चर्चा होते. दोन लेखक, एक वर्कशॉप, रक्ताचा वास, चेहऱ्यावरील भीती, खोदलेली कबर अशा गोष्टी यातून समोर येतात आणि काहीतरी वेगळे आणि भयाण समोर येणार याची खुणगाठ प्रेक्षक बांधतो.
निखिल लांजेकर दिग्दर्शित 'सापळा'ची कथा, पटकथा व संवाद श्रीनिवास भणगे यांचे आहेत. चित्रपटाची निर्मिती प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर यांची आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक निखिल लांजेकर म्हणाले की, "एक फिल्ममेकर म्हणून मी चांगल्या कथांच्या शोधात असतो. त्यातच सस्पेन्स थ्रिलर हा जॉनर माझ्या आवडीचा आहे. मला गूढकथा नेहमीच आवडत आल्या आहेत. उत्तम कथेच्या शोधात असताना प्रख्यात कथालेखक श्रीनिवास भणगे यांची एक अत्यंत प्रभावी आणि जुनी नाट्यसंहिता वाचनात आली. हे कथानक समयोचित असून त्याची आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत प्रेझेंट करीत आहे आणि ते प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे."
ट्रेलरविषयी दिग्दर्शक निखिल लांजेकर म्हणाले, “ट्रेलर आणि टीझरमधून ज्या गोष्टी समोर आल्या आहेत त्या केवळ हिमनगाच्या टोकाएवढ्या आहेत. अजून बरेच काही प्रेक्षकांसमोर यायचे आहे. चित्रपट पाहताना प्रेक्षकांना काहीतरी वेगळे आणि अभूतपूर्व पहिल्याची अनुभूती येईल.” चित्रपटाच्या निर्मितीबाबत ते पुढे म्हणाले, “मला गूढकथा नेहमीच आवडतात. अशा प्रकारच्या कथा या प्रेक्षकांना नेहमीच अत्यंत प्रभावीपणे भुरळ घालतात. एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून उत्तम कथेच्या शोधात असताना प्रख्यात कथालेखक श्री श्रीनिवास भणगे यांची एक अत्यंत प्रभावी आणि जुनी नाट्यसंहिता वाचनात आली. आपल्या मराठी साहित्याची भव्य कक्षा ही आश्चर्यचकित करणारी आहे. ही कथा आजच्या तंत्रज्ञानाची जोड देत मोठ्या पडद्यावर आणण्याचा मोह मी आवरू शकलो नाही.