अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (NAVNEET KAUR RANA) त्यांचे पती आमदार रवी राणा (RAVI RANA) सध्या चर्चेत आले आहेत. त्यांचा चर्चेत येण्याचा विषय आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (UDHDHAV THAKARAY) यांचे निवासस्थान असलेले मातोश्री या ठिकाणी जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. परंतु याला शिवसैनिकांकडून कडाडून विरोध होत आहे. आज आपण त्यांच्या लव्ह स्टोरी विषयी जाणून घेणार आहोत.
बाबा रामदेव (BABA RAMDEV) यांच्या आश्रमात नवनीतची रवी राणा यांच्याशी ओळख झाली होती. योगामध्ये विशेष रुची असलेल्या नवनीत कौर राणा यांचा बाबा रामदेव यांच्याशी घनिष्ठ संबंध आहे. एका योग शिबिरात नवनीतने रवी राणा यांची भेट घेतली होती.
नवनीत कौरने सामूहिक विवाह सोहळ्यात रवी राणाशी लग्न केले. 2 फेब्रुवारी 2011 रोजी झालेल्या या विवाह सोहळ्यात एकूण 3 हजार162 जोडप्यांचा विवाह झाला होता. आमदाराच्या या लग्न सोहळ्यात अनेक दिग्गजांनीही हजेरी लावली होती.यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरू बाबा रामदेव, सहारा प्रमुख सुब्रत रॉय आणि विवेक ओबेरॉय यांचाही सहभाग होता.
नवनीत राणा यांचा 3 जानेवारी 1986 रोजी मुंबईत जन्म झाला. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात तेलगू चित्रपटांमधून केली. त्यांचे वडील सैन्यात अधिकारी होते. नवनीत यांनी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर मॉडेलिंगला केली आणि अनेक म्युझिक अल्बममध्येही काम केले.
मॉडेलिंगमध्ये यशस्वी झाल्यावर त्या चित्रपटांकडे वळल्या. कन्नड चित्रपटाद्वारे त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली. यानंतर त्यांनी तेलगू, मल्याळम आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले.