16 ऑगस्टला नवी दिल्ली येथे नॅशनल मीडिया सेंटर येथे कलावंतांचा गौरव करून विजेत्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि हा सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. यासाठी अनेक भाषेतील चित्रपटांचा सत्कार करण्यात आला. यादरम्यान 'राष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारासाठी' मराठी चित्रपटसृष्टीतील वाळवी या चित्रपटाला जाहीर करण्यात आले. तसेच मल्ल्याळी चित्रपटसृष्टीतील 'आट्टम' या चित्रपटाला देखील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. यामध्ये अनेक चित्रपट, संगीत, कलाकार तसेच इतर पुरस्कारासाठी अनेक जण मानकरी ठरले, जाणून घ्या कोणाला कोणता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
जाहीर केलेले राष्ट्रीय पुरस्कार पुढील प्रमाणे:
1. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : वाळवी
2. सर्वोत्कृष्ट मल्ल्याळी चित्रपट: आट्टम
3. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट: गुलमोहर
4. बेस्ट आर्ट कल्चरल फिल्म: वारसा
5. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट: कंतारा
6. बेस्ट स्टंट कोरियोग्राफी : केजीएफ 2
7. बेस्ट एक्शन डायरेक्शन अवॉर्ड: केजीएफ चैप्टर 2
8. सर्वोत्कृष्ट अभिनेता: 'कंतारा' चित्रपटातील ऋषभ शेट्टी
9. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: नीना गुप्ता "उँचाई"
10. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: अर्जित सिंह "ब्रह्मास्त्र"
11. सर्वोत्कृष्ट संगीतकार: प्रीतम "ब्रह्मास्त्र"
12. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: पवन राज मल्होत्रा "फौजा, हरियाणवी चित्रपट"
13. बेस्ट पार्टी: अपराजितो "सोमनाथ कुंडू"
14. बेस्ट प्रोडक्शन डिझाईन: अपराजितो "आनंद आध्या"
15. बेस्ट साउंड डिझाईन: पोन्नयिन सेल्वन 1 "आनंद कृष्णमूर्ति"
16. बेस्ट सिनेमेटोग्राफी: पोन्नयिन सेल्वन 1 "रवि वर्मन"
17. बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट: श्रीपथ "मलिकापुरम"
18. बेस्ट डॉक्यु्मेंटरी: मर्मर्स ऑफ द जंगल
19. बेस्ट प्रोडक्शन डिझाईन: अपराजितो
20. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: बॉम्बे जयश्री
21. बेस्ट एडिटिंग अवॉर्ड: अट्टम
22. बेस्ट प्रोडक्शन डिझाईन: अपराजितो
23. बेस्ट बुक ऑन सिनेमा: किशोर कुमार: द अल्टीमेट बायोग्राफी
24. स्पेशल म्यूजिक मेंशन: संजय सलील चौधरी